माई मीडिया 24 तर्फे वडाळा, मुंबई येथे ‘प्रति पंढरपूर’ भाविकांना लाडू व चिक्कीचे वाटप

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
गणेश तळेकर
मुंबई :प्रतिनिधी
आषाढी एकादशीनिमित्त मुंबईतील वडाळा येथे ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लागलेल्या या ठिकाणी, भाविकांची सेवा करत “माई मीडिया 24” संस्थेने उल्लेखनीय उपक्रम राबवला.

पत्रकार सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या “माई मीडिया 24” च्या वतीने रविवारी दर्शनासाठी आलेल्या पांडुरंग भक्तांना पाकिटबंद हायजिनिक लाडू व चिक्कीचे मोफत वाटप करण्यात आले. “भक्तसेवा हीच ईश्वर सेवा” या भावनेतून हा उपक्रम उत्साहात पार पडला.

या उपक्रमासाठी “भूमिसम्राट” चे संपादक चंद्रकांत गोखले यांचे सहकार्य लाभले. माई मीडिया 24 च्या अध्यक्षा शीतल करदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र कार्याध्यक्ष सचिन चिटणीस यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये मुंबई जिल्हा संघटन समन्वयक गणेश तळेकर व सदस्य विजय कांबळे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. शिवसेना खासदार मा. विनायक राऊत, आमदार महेश सामंत यांच्यासह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी या उपक्रमाचे कौतुक करत सहभाग घेतला.

या लाडू व चिक्की वाटपाचा लाभ भाविकांनी प्रसाद म्हणून घेतला. दिवाळीसारखी वाटणारी ही वारी आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठीची आस, ‘माई मीडिया 24’ च्या उपक्रमामुळे अधिक संस्मरणीय ठरली.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *