अहिल्ल्यानगर येथील प्रसिद्ध लेखक आणि संगीतकार महेश दादासाहेब मस्कर यांना त्यांच्या उत्कृष्ट साहित्यिक आणि संगीत योगदानासाठी वीर शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. चैतन्य कानिफनाथ फाऊंडेशन व युवा क्रांति न्यूज मिडीया महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
महेश मस्कर यांनी “गणराया तू माझी माऊली”, “माझी एकविरा माऊली”, आणि “नऊवारी गुलाबी साडी” या गाण्यांसाठी अप्रतिम लेखन आणि संगीतनिर्मिती केली आहे. त्यांच्या या योगदानाची योग्य दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला. या सोहळ्यात चैतन्य कानिफनाथ फाऊंडेशनचे अध्यक्ष तुषार बोरुडे आणि फॅशन डिझाइनर साक्षी खणसे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
सोहळा दिमाखात पार पडला, आणि महेश मस्कर यांचे कौतुक सर्वत्र होत आहे.