रस्ता दुरुस्त न झाल्यास नागरीकांचे आंदोलन |

बातमी Share करा:

म्हसवड दि. ६
म्हसवड नगरपरिषदेच्या वतीने येथील कैकाडी गल्ली  ( क्रांतीनगर ) येथे अंतर्गत रस्त्याचे करण्यात आलेले कॉक्रीटीकरण हे अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झाले असुन सदर रस्त्याचे काम पुनश्च करावे तर संबधित ठेकेदारावर कारवाई करावी अन्यथा प्रजासत्ताक दिनी पालिका विरोधात आंदोलन करण्याचा इशारा येथील रहिवाशांनी निवेदनाद्वारे पालिकेला दिला आहे.
  म्हसवड पालिकेच्या वतीने शहरातील सर्व अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट कॉक्रीटीकरणाचे काम करण्यात आले आहे, येथील कैकाडी गल्ली, द्रोणागिरी रुग्णालयासमोरील रस्त्याचेही कॉक्रीकरण गत ८ महिन्यांपुर्वी करण्यात आले आहे. संबंधित रस्त्यावर पालिकेने कॉक्रीटीकरणाच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी केली असुन अवघ्या ६ महिन्यातच सदर रस्त्यावरील कॉक्रीटीकरणाचे थर निघु लागल्याने सध्या या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत या खड्डयांमुळे या परिसरात प्रचंड धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, ही धुळ सदर परिसरातील घरांमध्ये जात असुन रोज उडणार्या या धुळीमुळे येथील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तर येथे उडणारी धुळ ही येथील घरातील अन्नधान्यांवर बसत असल्याने या परिसरात रुग्णसंख्या वाढत आहे, नागरीकांच्या सोयी सुविधेसाठी पालिकेने रस्ता केला आहे की नागरीकांच्या आरोग्याशी खेळ करण्यासाठी असा संतप्त सवाल येथील रहिवाशांनी करीत सदर रस्ता पालिकेने तात्काळ दुरुस्त करुन नागरीकांच्या आरोग्याशी खेळ करणार्या ठेकेदारावरही कारवाई करावी अन्यथा २६ जानेवारी या प्रजासत्ताकदिनी पालिका विरोधात आंदोलन करण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.
चौकट –
 पालिकेने कामांची तपासणी करुनच ठेकेदारांची बीले अदा करावीत –
म्हसवड पालिकेच्या वतीने आजवर जी काही विकासकामे झाली त्या सर्व विकासकामांच्या दर्जावर अनेकदा नागरीकांनी प्रश्न उपस्थित करीत काहीवेळा आंदोलनेही केली आहेत, शासनाकडुन नागरीकांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पालिकेला कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जातो, मात्र यातुन होणारी विकासकामे त्याचा दर्जा याची पालिकेकडुन खरच तपासणी होती का ? असा सवाल यानिमीत्ताने निर्माण होत असुन प्रशासनाने ठेकेदारांचे हित जोपासण्यापेक्षा विकासकामे प्रसिद्ध केलेल्या निवेदेप्रमाणे होत आहेत काय ? संबधित ठेकेदार हा त्या पात्रतेचा आहे काय ? त्याच्याकडे आवश्यक ती सर्व यंत्रणा आहे काय ? हे पाहणे गरजेचे आहे.
नागरीकांचे प्रशस्तीपत्र ठेकेदाराला आवश्यक करावे  –
 पालिकेने प्रत्येक एरियात विकासकामे करताना काहीवेळा चांगली कामे होवुनसुध्दा केवळ राजकारण म्हणुनही अनेकदा त्या कामांवर तक्रारी केल्या जातात अशा तक्रारींना आळा घालण्यासाठी पालिकेने पालिका अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरु असलेल्या प्रत्येक एरियात स्थानिक नागरीकांची एक कमिटी करावी त्या कमिटीमध्ये सर्वच पक्षातील अथवा बिगर राजकीय व्यक्तींना घेवुन ती कामे दर्जेदार व्हावीत याची जबाबदारी द्यावी ती कामे पुर्ण झाल्यावर संबधित नागरीकांच्या कमिटीने कामाचे प्रशस्तीपत्र पालिकाला द्यावे त्यानंतरच संबधित ठेकेदाराला त्या कामांचे बील‌ अदा करावे, त्यानंतर मात्र त्या कामाबाबत काही प्रश्न निर्माण झाल्यास संबधित कमिटी ला जबाबदार धरावे व त्यांच्याकडुनच त्या कामाची नुकसान भरपाई घ्यावी यामुळे सर्वच ठिकाणी कामे दर्जेदार होतील शिवाय पालिकेला आंदोलनाला वारंवार सामोरे जावे लागणार नाही.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!