मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब तुमचे लपाचे अभियंता, कर्मचारी जागे करा..:नगरसेवक महेश जाधव
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
म्हसवड :
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब दुष्काळी माण तालुक्यातील मंजूर झालेल्या कामांना निधी येऊन देखील आपले लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी कर्मचारी झोपले आहेत. अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर उडवा उडवीची उत्तर देऊन अजून निधी आला नाही.? कर्मचारी नाहीत..? आम्हाला वेळ मिळाल्यानंतर बघू..? अशी उत्तर देतात मग दिवसभर अधिकारी ऑफिसमध्ये बसून करतात काय..? याची जरा उजळणी आपण घ्यावी. का फक्त टक्केवारी पुरतेच अधिकारी काम बघणारे का..? असा प्रश्न नगरसेवक महेश जाधव यांनी म्हसवड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
गेल्या दोन वर्षापासून अटल भूजल योजनेची तीन तेरा वाजले होते. आता कुठेतरी निधी आला असता. गेल्या महिन्याभरापासून नुसत्या टेंडर प्रक्रियेत काम अडकून पडणारे अधिकारी नक्की कोणाच्या सांगण्यावरून टेंडर प्रक्रिया राबवत नाहीत ना..? याची माहिती घ्यावी, अटल भूजल योजनेद्वारे दहा कोटी रुपये लघुपाटबंधारे विभागाकडे निधी वर्ग केले असल्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रकाश बेडसे यांनी दिली आहे. मात्र आमच्याकडे निधीचा आला नाही. असे कारण लघुपाटबंधारे विभागाचे अभियंता सांगत आहेत. नक्की हा प्रकारच काय हा सर्वसामान्य दुष्काळी जनतेला समजू तरी द्या..! प्रशासकीय मान्यता मिळून देखील निधी उपलब्ध नाही असं कारण आपले अभियंता देतात कसे. मग जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता देताना खोट्या कागदावरती सह्या दिल्या का..? ज्यामुळे निधी मिळणार नाही. मग प्रशासकीय मान्यता मिळाली कशी..? हाच मोठा प्रश्न उपस्थित होतो. नक्की या दुष्काळी भागात आपणास व आपल्या कर्मचाऱ्यांना काम करण्याची इच्छा आहे का.? की, फक्त शासनाचा पैसा खाण्यातच आपल्या कर्मचाऱ्यांना मज्जा वाटते हे देखील आपण पाहूवे.
येत्या आठ ते दहा दिवसात लघुपाटबंधारे विभागामार्फत टेंडर प्रक्रिया राबवून दुष्काळी भागातील गाळ काढणे तसेच पाझर तलाव दुरुस्ती असेल ही कामे जर चालू झाली नाहीत तर जिल्हापरिषद कार्यालयवरती शेकडो नागरिकांसह मोर्च्याचे नियोजन आम्हाला करावे लागणार आहे. त्यामूळे आपण याकडे लक्ष द्यावे असे जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी संजय माने, गणेश पाटील, अरिविंद हुबाले, अमोल खोत, किरण शेटे उपस्थीत होते.
ReplyForward
|