महात्मा फुले पुतळ्याच्या दुरवस्थेवर मनविसे आक्रमक – तीव्र आंदोलनाचा इशारा
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते कराड
कराड शहरातील बुधवार पेठ येथील सत्यशोधक महापुरुष महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या परिसराची दुरवस्था झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक झाली असून त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कराड येथील बुधवार पेठतील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे गेट अनेक वर्षापासून तुटून पडल्यामुळे परिसरातील मोकाट कुत्र्यांनी आपला घरोबा तयार केला आहे. त्यामुळे मोकाट कुत्री शिळे अन्न खाऊन तिथेच विस्टा करत असल्यामुळे महात्मा जोतिबा फुले याच्या पुतळ्याच्या परिसरात प्रचंड मोठया प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या प्रश्नाकडे कराड नगर परिषदेचे सर्रास दुर्लक्ष होत असल्यामुळे महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष,विनायक भोसले यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या गेटची डागडूजी आणि नवीन गेट बसावे व पुतळ्याजवळ मोठ्या प्रमाणात वाढलेले गवताची स्वच्छता व्हावी यासाठी त्यांनी यापूर्वीही कराड नगर परिषदेला वारंवार निवेदन देऊन सुद्धा कराड नगरपरिषदेने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी प्रसंगी केला
विनायक भोसले पुढे म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले हे एक महान समाज सुधारक होते, ज्यांनी सामाजिक न्याय, समानता, आणि शिक्षणासाठी खूप महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्यांनी अस्पृश्यता, जातीभेद, आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी आवाज उठवला. त्यांनी 1848 सालि मुलींसाठी शाळा सुरू केली. आणि सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अशा महान महापुरुषांच्या पुतळ्यांकडे कराड नगरपरिषदेला वारंवार निवेदन देऊन सुद्धा मुद्दाम दुर्लक्ष करत असेल,तर याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काहीच नाही.
यावेळी कराड नगरपरिषद संबंधित अधिकारी यांची विनायक भोसले व मनसे पदाधिकारी भेट घेतली असता त्यांनी येत्या दोन दिवसांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या परिसराची स्वछता व डागडुजी करण्याचे आश्वासन याप्रसंगी दिले आहे. त्यावर विनायक भोसले संबंधित अधिकाऱ्यांना म्हणाले, येत्या दोन दिवसांमध्ये कराड नगरपरिषद संबंधित अधिकारी यांनी आश्वासन पूर्तता केली नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तीव्र आंदोलन करून कराड नगर परिषद प्रशासनाला घाम फोडल्याशिवाय गप्प बसणार नाही.

