म्हसवड शहरांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची भव्य दिव्य अशी जयंती विविध कार्यक्रमाने साजरी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
                 म्हसवड शहरांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची  जयंती  विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात  साजरी करण्यात आली महात्मा फुले जयंतीचा कार्यक्रम १० एप्रिल आणि ११ एप्रिल असा दोन दिवस चालला यामध्ये १० एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या कार्यावरती राहुल महाराज फडतरे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते तसेच ११ एप्रिल रोजी म्हसवड शहरातील तरुणांनी कडगून या महात्मा फुले यांच्या जन्म गावावरून ज्ञानज्योत आणण्यात आली ज्योतीचे स्वागत म्हसवड शहरातील रेस्ट हाऊस या ठिकाणी करण्यात आले तसेच ही ज्ञानज्योत म्हसवड शहरातील विविध वाडी वस्तीवर फिरवण्यात आली रेस्ट हाऊस वरून दहिवडे मळा, केवटे मळा, झगडे मळा, खासबाग, डावखरे मळा, खारा मळा ,आंबेडकर भवन ,नामदेव कोल्हे ,कडवणे, पानमळा ,लांब मळा ,चोपडे वस्ती, तावसे मळा, महादेव मळा, शिंदे वस्ती, माळी गल्ली या ठिकाणावरून फिरवून आणून महात्मा फुले चौक येथे आणण्यात आले व महात्मा फुले यांच्या प्रतिमेस ही ज्ञानज्योत ओवाळून प्रतिमा पूजन करण्यात आले
       तसेच महात्मा फुले जयंती निमित्त भव्य असे रक्तदान शिबिर घेण्यात आले होते तसेच शिंदे वस्ती या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा येथे शिक्षणासाठी शिंदे वस्ती महात्मा फुले जयंती उत्सव समितीने एलईडी टीव्ही मुलांच्या शिक्षणासाठी शाळेला दिला तसेच कोल्हे मळा कडणे वस्ती नामदेव वस्ती पण मळ्यातून ३५ हजार रुपये किमतीचे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरील पुस्तके वाटप करण्यात आली तसेच यूपीसी एमपीसी चे नवीन पुस्तके वाटण्याचा कार्यक्रम करण्यात आला,यावेळी गुणवंत विद्यार्थी व नवीन झालेल्या अधिकाऱ्यांचे सत्कार महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले तसेच नदीपलीकडील डावखरे मळा केवटे झगडे दहिवडे वस्ती वस्तीने अन्नदानाचा खर्च उचलला आणि म्हसवड शहरातील लांब मळ्याने गोड अन्नदानाचा खर्च उचलला तसेच म्हसवड शहरातील हजारोच्या संख्येने महिला आणि पुरुष महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती उत्सवामध्ये सामील होऊन भव्य अशी म्हसवड शहरातून महात्मा फुले यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली या मिरवणुकीचा प्रारंभ आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला यावेळी हजाराच्या संख्येने महिला व हजारोच्या संख्येने पुरुष उपस्थित होते मिरवणुकीच्या नंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आटोपून हा जयंती उत्सव समाप्ती करण्यात आली

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!