रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय व जुनिअर कॉलेज दहिवडीचे तालुकास्तरीय कबड्डी व मैदानी स्पर्धेत वर्चस्व कायम…

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
विजयकुमार ढालपे
  गो़दवले
  महात्मा गांधी विद्यालय व जुनिअर कॉलेज दहिवडीने शैक्षणिक गुणवत्तेबरोबर क्रीडा क्षेत्रातील अग्रेसर राहण्याचा मान मिळवला आहे. याचेच उदाहरण म्हणजे नुकत्याच शंभू महादेव विद्यालय वरकुटे-म्हसवड येथे झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज दहिवडी मधील मुलांच्या सतरा वर्षे वयोगटाखालील कबड्डी स्पर्धेत पारंपारिक प्रतिस्पर्धी गणेश विद्यालय नरवणे या संघावर दणदणीत विजय मिळवला. त्याचबरोबर 19 वर्षे वयोगटातील मुलींचा संघ उपविजेता ठरला.तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये महात्मा गांधी व ज्युनिअर कॉलेज दहिवडीच्या कबड्डीपटूंनी पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले.
   याचबरोबर मैदानी स्पर्धेत ही महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजने आपला ठसा कायम राखला. 19 वर्षाखालील मुले 3000 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक तसेच 19 वर्षाखालील मुली  4*100 रिले स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर शंभर मीटर धावणे 19 वर्षाखालील मुली द्वितीय क्रमांक, गोळा फेक द्वितीय क्रमांक पटकावला.
        या यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री ज्ञानेश काळे सर,श्री धर्मराज पवार सर,श्री बाबा चौधरी सर आणि सौ मीना पाटील मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
     महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यालयाचे प्राचार्य श्री बी एस खाडे सर, पर्यवेक्षक श्री ए बी शेख सर तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या…

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!