महात्मा फुले पतसंस्थेच्या अध्यक्षपदी उत्तम लिंगे तरउपाध्यक्षपदी बबन अब्दागिरे
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड, (प्रतिनिधी)
येथील महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होऊन संस्थेच्या अध्यक्षपदी उत्तम हरिबा लिंगे यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी बबन मधुकर अब्दागिरे यांची निवड करण्यात आली. महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेचे २०२२-२३ ते २०२७-२८ या कालावधीसाठी पुढील प्रमाणे संचालक
मंडळाची निवड करण्यात आली. संचालक म्हणून अरुण किसन मुकिरे, अजिनाथ बापू कलढोणे, विजय मारूती खासबागे, आशाताई भारत पिसे, इंदुमती आनंद पिसे, अजिनाथ लक्ष्मण केवटे, दादासाहेब गणपत दोरगे, अशोक कृष्णा लोखंडे यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या संचालकांचे आमदार जयकुमार गोरे, माजी नगराध्यक्ष विजय घट, सुरेश म्हेत्रे, नितीन दोशी, डॉ. वसंत मासाळ, सुनील पोरे, माजी नगरसेवक सतीश केवटे, अरविंद पिसे, लुनेश विरकर, संतोष पिसे, शिवदास केवटे, रामा गुरव आदीनी अभिनंदन करण्यात आले.