शिक्षण क्षेत्रातील अतुल्य सेवेबद्दल अहिल्या शिक्षण संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव
हीरक महोत्सवी वर्षांत संस्थेची घौडदौड महाराष्ट्राच्या पटलावर
म्हसवड-
सांगली येथील महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन संस्थेने ‘ ग्रामीण भागात शैक्षणिक क्रांती करण्यात मोलाची कामगिरी केल्याबद्दल लोकमत पुणे समूह व महा एनजीओ फेडरेशन यांच्या वतीने “लोकमत अतुल्य सेवा” या पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले.
लोकमतचे संस्थापक, संपादक आणि स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या. जन्मशताब्दीचे औचित्य साधून हा सन्मान सोहळा लोकमत समूह व महा एनजीओ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल अहिल्या शिक्षण संस्थेचा सन्मान पद्मश्री गिरीश प्रभुणे व व्हाआयपी सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महासंचालक श्री कृष्ण प्रकाश हस्ते करण्यात आला. यावेळी लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे, वरिष्ठ महाव्यवस्थापक मिलन दर्डा, महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्निल बापट, रविंद्र धारिया, अक्षय महाराज भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.संस्थेचे चेअरमन आर.एस चोपडे सर व संस्थेच्या जेष्ठ सल्लागार सौ.यू.आर.चोपडे मॅडम यांनी हा सन्मान स्वीकारला, त्यावेळी त्यांच्या सोबत संस्थेचे प्रसिध्दी विभाग प्रमुख व संस्थेचे संचालक लुनेश विरकर ही उपस्थित होते.हा सन्मान सोहळा पुणे येथील श्रमिक पत्रकार भवनात मध्ये संपन्न झाला.यावेळी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेची स्थापना १९६० साली बॅरिस्टर कै.टी.के.शेंडगे साहेब यांनी पेड ता.तासगाव या ठिकाणी केली.मुळात ही शिक्षण संस्था सांगली,सातारा,सोलापूर या जिल्ह्यातील दुर्गम,ग्रामीण व दुष्काळजन्य भागात कार्यरत असून या संस्थेमुळे ग्रामीण भागातील पिचलेल्या मागासवर्गीय बहुजन समाजाला शिक्षण प्रवाहात आणण्यात मोठे यश संस्थेला प्राप्त झाले आहे.ज्या ठिकाणी दळणवळणाच्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत अशी ठिकाणे संस्थेने आपली कार्यक्षेत्र निवडून त्याच ठिकाणी शैक्षणिक क्रांती करून दाखवली आहे.मागिल वर्षी संस्थने हीरक महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले, त्याचा सांगता समारंभ पुढील आठवड्यात मंत्री महोदय यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
संस्थेचे विद्यमान चेअरमन आर.एस.चोपडे सर यांच्या संकल्पनेतून संस्थेत विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.त्यामध्ये प्रामुख्याने ‘अहिल्या पॅटर्न’ ची निर्मिती करून या पॅटर्नच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच संस्थेचे अंतिम ध्येय मानून विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले जाते,त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाठी विद्यार्थ्यांना खेळाची,व्यायामाची, व्यसनापासून स्वतःसह कुटूंबाला दूर ठेवण्या संदर्भात विशेष मार्गदर्शन करण्यात येते.या वरून स्पष्ट होते की संस्थेत विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांचा सर्वांगीण विकास करण्याबरोबरच आदर्श सुसंस्कृत माणूस घडविण्यासाठी संस्था विशेष परिश्रम घेत आहे.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेत कुटूंबांतील परिस्थितीचा व स्वभोवतःलच्या वातावरणाचा अध्ययनावर प्रभाव पडत असल्यामुळे संस्थेने गृहभेटी उपक्रम मागील दहा पंधरा वर्षा पासून प्रभावीपणे संस्थेत राबविला जात आहे.शाळेत पालक मेळावे आयोजित करून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक व इतर गोष्टी बाबत सकारात्मक चर्चाचे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग प्रेम निर्माण करून पर्यावरण विषय जनजागृती करण्यासाठी वृक्ष लागवड,निसर्गाच्या सानिध्यात वनभोजन असे नवनवीन उपक्रम संस्थेत जाणीवपूर्वक राबविले जात आहेत.रक्षाबंधन,बैल पोळा असे सर्व उत्सव संस्थेतील सर्व शाळा मध्ये साजरे केले जात आहेत.
शाळेत वर्षभर महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साजर्या करून विद्यार्थ्यांमध्ये महापुरूषांचे आचर विचार रूजविण्याचे प्रामाणिक काम पार पाडले जाते.त्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात,त्यामध्ये प्रामुख्याने सांस्कृतिक कार्यक्रम,वकृत्व स्पर्धा,निंबध स्पर्धा,पाककला,वेशभूषा,मेंहदी काम अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात.त्याचबरोबर खेळांचे सामने आयोजित केले जातात.या संस्थेने अनेक खेळांडूना राष्ट्रीय खेळाडू बनविण्याचे काम केले आहे.
या सर्व गोष्टी बरोबर विद्यार्थ्यांचा गुणात्मक वाढीसाठी सुध्दा विशेष प्रयत्न केले जातात.ज्यादा तासिका,रात्र अभ्यासिका,विशेष सराव परिक्षा,तज्ञ मार्गदर्शकाचे मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबविले जात असून स्कॉलरशिप,नवोदय,एन.एम.एम.एस, एन.टी.एस अशा विविध स्पर्धात्मक परिक्षांची उत्तम तयारी करून घेण्यासाठी संस्थे मार्फत स्पर्धात्मक परिक्षांचे ज्यादा तासिका विना मोबदला घेऊन विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले जाते.आत्ता पर्यंत शकडो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीधारक बनविण्यात संस्थेला यश आले आहे.
शाळांची गुणात्मक वाढ व्हावी म्हणून संस्थे मार्फत सर्व शाखांची वार्षिक तपासणी केली जाते.संस्थेतील दर वर्षी एका शाखेत संस्था अधिवेशन आयोजित करून संस्थेतील गुणवंत शिक्षक,विद्यार्थ्यी,शाळा यांचा गुणगौरव व शिक्षण क्षेत्रातील नवनवीन आव्हाने यावर साधक बाधक चर्चा विनमय केला जातो.समाजात ,शाळेत सकारात्मक विचार रुजविण्यासाठी संस्थे मार्फत सद्गुरू वामनराव पै यांच्या विचारावर आधारित जीवन विद्येची ऑनलाईन आत्तापर्यंत पासष्ट ऑनलाईन व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.महाराष्ट्रातील एकमेव टीचर मॅनेजमेंट संस्था म्हणून अहिल्या शिक्षण संस्थेची ओळख असून संस्थेची २५ युनिटे सध्या कार्यरत आहेत.
हा सन्मान अहिल्या परिवारातील प्रत्येक सेवकाचा आहे.संस्थेतील सेवकांनी प्रमाणिकपणे ज्ञानदानाचे काम करून संस्था वाढीसाठी विशेष परिश्रम घेतले, त्यामुळेच संस्थेचा आज सन्मान होत असल्याची भावना चेअरमन आर.एस.चोपडे सर व्यक्त केली.
एकूणच विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्याला एक आदर्श सुसंस्कृत माणूस घडविण्यासाठी संस्थेने राबविलेले उपक्रम शिक्षण क्षेत्रात विशेषता ग्रामीण भागाला नक्कीच दिशादर्शक ठरत आहेत.संस्थेच्या याच शैक्षणिक कार्याची दखल घेऊन संस्थेला यापूर्वीच ग्रामीण भागातील आदर्श शैक्षणिक संस्था हा राज्यस्तरीय पुरस्कार माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते प्राप्त झाला आहे.संस्थेचा लोकमत अतुल्य सेवा देणारी संस्था म्हणून जो सन्मान झाला . त्याबद्दल शैक्षणिक,सामाजिक,सहकारसह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून संस्थेचे चेअरमन आर.एस चोपडे सर यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.