क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात महापरिनिर्वाण दिन साजरा.
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड… प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात विविध उपक्रमाच्या माध्यमातून महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला
भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे आयोजित केला होता. या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषिरत्न प्रा .विश्वंभर बाबर यांचे हस्ते करण्यात आले .यावेळी संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर व पुनम जाधव पांडुरंग भोसले यांच्यासह संकुलातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
त्यानिमित्ताने क्रांतिवीर शाळेतील उपशिक्षक महादेव बनसोडे यानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अष्टपैलू जीवन कार्याची माहिती उपस्थितताना दिली. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही भारत देशाची राज्यघटना लिहिण्याचा बहुमान डॉक्टर आंबेडकर यांना मिळाला म्हणूनच त्यांच्या कार्याची पताका साता समुद्रा पलीकडे गेल्याचे महादेव बनसोडे यांनी स्पष्ट केले. समाजातील दलित , शेतकरी , कष्टकरी, मजूर यांच्या सह सर्व सामान्य जनता व युवा वर्गासाठी डॉक्टर आंबेडकर यांनी केलेले कार्य उल्लेखनीय व प्रेरणादायी असल्याचे बनसोडे यांनी सांगितले .डॉक्टर बाबासाहेबांचे कार्य हा लोकशाहीचा आत्मा असून ते कार्य टिकवण्याची जबाबदारी सुजाण नागरिकावर असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.
या निमित्ताने हर्षदा मासाळ, आयुध धावड ,ओवी सूर्यवंशी , सानवी कुंभार, जागृती माने , स्वराली माने, संचिता सस्ते , उत्कर्ष खाडे, दर्शनी लोखंडे या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याबाबत मनोगत व्यक्त केले.
संकुलातील महापरिनिर्वान दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपशिक्षिका प्रतिभा कोळेकर व दीप्ती बागवे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी खांडेकर व अनुष्का पिसे यांनी केली तर उपस्थितांचे आभार भूमिका लुबाळ हिने व्यक्त केले.