रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त ५५ हजाराचा नोटांचा हार व ५५ हजाराचा धनादेश

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
राष्ट्रीय समाज पक्षाचे सिंधुदुर्ग नेते बबन बोडेकर यांनी साहेबांच्या 55 व्या वाढदिवसाच्यानिमित्ताने 55 नोटांचा हार घातला साहेबांना तसेच राष्ट्रीय समाज पक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने 55 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
      कार्यकर्ता संवाद सभेत उस्फुर्त पणे सर्व  कार्यकर्त्यानी भाग घेऊन पक्षाचे विचार समजून घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष संघटना चांगल्या प्रकारे वाढविण्याचे सर्वांनी साहेबाना वचन दिले असून साहेबानी सर्व कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन करून पुढील भूमिका विशद केली तसेच आगामी काळात होऊ घातलेले सर्व पुढील पक्षाच्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली व आवाहन केले त्याला सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
आजच्या कार्यक्रमात महिलांचा जास्त सहभाग होता.सभा यशस्वी करण्यासाठी सर्वश्री जिल्हा अध्यक्ष अडओकेट-किशोर वरक, जिल्हा प्रभारी राजेंद्र माने,जिल्हा उपाध्यक्ष-श्री.बुट्टे, जिल्हा सरचिटणीस मो.जाफर शेख,माजी जिल्हा अध्यक्ष-सुरेश झोरे,जिल्हा संपर्क प्रमुख-संजय बोडेकर, संत बाळू मामा न्यासाचे ट्रस्टी व उद्योजक-बबनसेट बोडेकर व इतर बहुसंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते तसेच इतर प्रमुख पक्षांचे पदाधिकारी कार्यक्रमास भेट देऊन साहेबाना भेटून स्वागत करून गेले,
रायगड मधून रायगड जिल्हा अध्यक्ष श्री-संपत ढेबे यांनी तर राज्यकार्यकरिणी सदस्य श्री-भगवान ढेबे यांनी भाग घेतला

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!