महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महायुतीला धक्का: महादेव जानकर यांचा महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय!

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड (प्रतिनिधी )
राजकीय वातावरण तापताना एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी राज्यातील २८८ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. जानकर यांनी महायुतीवर नाराज नसल्याचे सांगत, “राष्ट्रीय समाज पक्ष भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेससारखा मोठा पक्ष व्हावा, यासाठी हा निर्णय घेतला आहे,” असे स्पष्ट केले आहे.

महायुतीसोबत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत लढलेल्या जानकरांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. जागावाटपाबाबत नाराजी व्यक्त करत, त्यांनी पक्षाच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे महायुतीला धक्का बसला असून, आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती या संघर्षात जानकरांचा पक्ष नव्या समीकरणाची सुरुवात करेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!