श्री.गुरु विठ्ठलनाथ महाराज देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्त महापुजा सोहळा व महाप्रसादाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला 

नांदेड/अर्धापूर :- उध्दव सरोदे

श्री.क्षेत्र खाजाबंदेनवाज साहेब,गुरू जालीदंरनाथ देवस्थान गोपाळचावडी येथे श्री.गुरु विठ्ठलनाथ महाराज यांच्या कॄपा आशीर्वादाने ता.१४ फेब्रुवारी शणिवार रोजी महाशिवरात्री महापुजा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याठिकाणी महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला अखंड महापुजा आणि महाशिवरात्री निमित्त दर सोमवारी महापुजा कार्यक्रम होत असतात.आपल्या सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी श्री.गुरू विठ्ठलनाथ महाराज मंदिर देवस्थान गोपाळचावडी ता.जि. नांदेड येथे अखंड महाशिवरात्री मासा निमित्त दररोज पहाटे ४ ते ६ काकडा आरती हि श्री.संत गुरू दामुनाथ पिता विठ्ठलनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते झाली.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्री.महंत १०८ यदुबन (गोकुळबन) गुरू गंभीरबन महाराज कोलंबी,श्री.संत बाळगीर पंचमगीर रावसाहेब महाराज आळणी बुवा मठ संस्थान यांच्या शुभ हस्ते श्री.गुरू विठ्ठलनाथ महाराज यांच्या मुर्ती, पादुका व कलश पूजन संपन्न झाले.

     श्री.संत गुरू दामुनाथ विठ्ठलनाथ महाराज यांचा सत्कार श्री.हभप मंगनाळे महाराज वसरणी यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी गोविंद महाराज मुक्तेश्वर आश्रम नांदेड,श्री. गंगाधर रानवळकर आदि उपस्थिती होते.या महाशिवरात्री महापुजा कार्यक्रमास आलेल्या सर्व संत, महंत,ज्ञानी महात्मे व सर्व क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांचा सत्कार श्री.संत गुरू दामुनाथ विठ्ठलनाथ महाराज यांच्या हस्ते झाला.

      दुपारी महापुजा सोहळा कार्यक्रमात दत्तभजनी मंडळींनी आपली सेवा अर्पण केली. सर्व भाविक भक्तांनी दुपारी २ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत संत आशीर्वरचनाचा लाभ घेतला.या कार्यक्रमास आलेल्या सर्व सन्माननीय मान्यवरांचा सत्कार श्री. नवनाथ दामुनाथ डाकोरे गोपाळ चावडीकर यांच्या हस्ते करण्यात आला.

         महाशिवरात्री महापुजा सोहळा व महाप्रसादाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन सेवादास श्री.संत गुरू दामुनाथ विठ्ठलनाथ महाराज,श्री.नवनाथ दामुनाथ डाकोरे व समस्त गावकरी मंडळी गोपाळचावडी ता.जि.नांदेड यांच्या वतीने करण्यात आले होते व त्याप्रमाणे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *