म. बसवेश्वर जयंती निमित्त म्हसवड येथे दिनांक 22 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड- (दिलीपराज कीर्तने)
लिंगायत समाज म्हसवड यांच्या वतीने म्हसवड येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती दिनांक 22 रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे, अशी माहिती लिंगायत समाजाचे कार्यकर्ते कैलास भोरे यांनी नुकतीच दिली .
महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमात म्हसवड येथील लिंगायत समाजाच्या मठामध्ये आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी सर्व लिंगायत समाज व इतर भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.
                 शनिवार दिनांक 22 एप्रिल रोजी महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त म्हसवड येथील लिंगायत समाज मठामध्ये दुपारी बारा वाजता जन्म उत्सव साजरा करण्यात येणार असून महात्मा बसवेश्वर यांचा जन्मोत्सव करण्यात येणार आहे. सायंकाळी चार वाजता म्हसवड शहरातून महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक  शहरातील मुख्य
पेठेतून काढण्यात येणार असून या मिरवणुकीसाठी बहुसंख्य लिंगायत बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून सायंकाळी सात वाजता महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे.
महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सायंकाळी सात वाजता श्री,१०८ रुद्र पशुपती  कोळेकर महाराज यांच्या आशीर्वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून भाविकांनी या आशीर्वाचनासाठी उपस्थित राहावे ,तसेच सर्व समाजातील बंधू-भगिनींनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आलेआहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!