माण विधानसभेसाठी म. वि.आ चा उमेदवार अठरा पक्ष फिरलेला नसावा-संजय भोसले

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

बिजवडी : प्रतिनिधी
माण विधानसभेसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा म.वि.आ मधून उमेदवारीसाठीचा दावा कायम असणार आहे, परंतु अंतत: पक्ष प्रमुख मा.उध्दवजी ठाकरे जो काही निर्णय व आदेश देतील याचे पालन आम्हा शिवसैनिकांना बंधनकारक असेल, मात्र अशातच माण विधानसभेसाठी मविआ तील तीनही पक्षांतील प्रमुख नेतेडळींनी अठरा पक्ष फिरलेला उमेदवार जनतेवरती लादून निष्ठावंतांची अवहेलना व चेष्ठा देखील करु नये. याचा विचार वरिष्ठांनी करावा अशी आशा व परखड मत मविआ तील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सातारा जिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे मांडले.
निवडणूका जसजस्या जवळ यायला लागल्या की अनेकांचे अंगात येऊन काही मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून घोड्यावरती कायम सज्ज असतात, असे अनुभव व प्रकार आम्हाला नवे नसून, आमचे २९ वर्षांच्या राजकीय प्रवासात गेल्या अडीच वर्षांईतकी गढूळ राजकीय परस्थिती कधीच नव्हती , बोटावर मोजण्या ईतपतही जनतेशी बांधीलकी समजणणारे समाजसेवक राजकारणात उरलेतच कुठे ही शोकांतीका आहे.

     काँट्रॅक्टर,दारु -ढाबे,सावकारकी या अवैध धंदेवाल्यांचा राजकारणातील पांढरपेशी प्रवेश पैस्यातून सत्ता व सत्तेतून पैसा हेच समिकरण ठरवून माण खटाव तालुक्यातून एक मोठी टोळीच उदयास येऊन पुढार्‍यांचे अवभवती हुजरेगिरीसाठी कायम पडून असलेचे चित्र स्पष्ट झाले आहे.
मग काय निवडणूकांचे काळात पाणी प्रश्न जो की आजही ६०% भाग कोरडाखट्ट असून जनतेच्या कोरड्या घशाला टँकर शिवाय पर्याय नाही , विकासाच्या थापांचा नुसता ऊत येतो अशा विकाऊ बोलघेवड्या थापाड्यांच्या टोळक्यांपुढे सरतेशेवती बिचारी जनता गुडगे टेकून नाईलाजास्तव नतमस्तक होणेस भाग पडून सरतेशेवटी चोरांना वैतागून “कोण शहाणा उरला आहे का?” असे म्हणत मर्जी नसताना या गैर लोकांना स्विकारते आहे याचा कधीतरी वरिष्ठांनी यावेळी तरी विचार करायला हवा आहे.
         याचसाठी जनतेप्रति प्रेम,आदर असणारे तसेच मतलबापोटी आईबापाला विसरणारे नव्हे तर निष्ठेने स्वत:चे पक्षाला मायबाप समजणारांचा विचार व्हावा जनता नक्कीच नसेल पैसा परंतु चांगला उमेदवार एकदाच निवडून देईल, अन्यथा यावेळी जनता दलबदलुंना धडा शिकविण्यास सज्ज असलेचे सरतेशेवठी भोसले यांनी म्हटले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!