व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
चाफळ: प्रतिनिधी
श्रीकांत जाधव
मान्सूनच्या पावसामुळे चाफळ परिसरातील खरीप हंगामातील पिकांचे चांगलेच नुकसान झाले आहे. त्यामुळे पिकांच्या उगवणी बरोबरच त्यांच्या वाढीवरही त्याचा परिणाम झाला आहे.
उत्तर मांड धरण व डेरवण चा पाझरतलाव ओसंडून वाहत आहे. अति पावसामुळे खरीप हंगामातील सर्व पिके पिवळी पडून कुजू लागली आहेत. त्यामुळे यंदा पावसाने बळीराजाला चांगलेच रडवून सोडले आहे. नदी, नाले, ओढे, तुडुंब भरून वाहू लागले आहेत. पावसामुळे कडधान्यांच्या पिकावर ही परिणाम झाला आहे.
घेवडा,दारकू, बालूरे ही पिके रानात शोधूनही सापडत नाहीत. अति पावसामुळे शेतात साचून राहिलेल्या पाण्यामुळे पिकांची मुळे कुजून गेल्याने पिकांनी अक्षरशः माना टाकल्या आहेत. परिसरात विदारक परिस्थिती दिसत आहे. त्यामुळे हाता तोंडाशी आलेली पिके जाण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसत आहे. पिके पिवळी पडल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊन त्यांचेआर्थिक नियोजन कोलमडले आहे.