घरफोडी चोरीच्या गुन्हयातील आरोपीस लोणंद पोलीसांनी मध्यप्रदेश मधुन ताब्यात घेवुन रोख रक्कम रु.९,लाख८६हजार,९०० रोकड केली जप्त
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
By:सादिक शेख
गोंदवले खुर्द प्रतिनिधी
लोणंद पोलीस ठाणे हद्दीत मौजे.सुखेड ता.खंडाळा गावचे हद्दीतील रिअल ग्रीन फ्लोअर मिल प्रा. लि. या कंपनीच्या ऑफिसचे
खिडकीच्या काचा कोणीतरी अनोळखी चोरटयाने काढुन आतमध्ये प्रवेश करुन ऑफिसचे कॅबीनच्याटेबलचे ड्राव्हरचे लॉक तोडुन त्यामधील ९लाख,९१ हजार,५००/- रुपये घरफोडी चोरी करुन चोरुन नेली होती. त्याबाबत समीर नुरमहंमद इनामदार यांनी दिनांक ०१/०४/२०२३ रोजी तक्रार दिली तक्रारीवरुन लोणंद पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा तपास चालु असताना पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विशाल वायकर वपोउनि गणेश माने यांनी गुन्हयाचे गांभिर्य ओळखुन सीसीटिव्ही फुटेज व तांत्रीक माहीतीचे आधारे माहितीप्राप्त करुन आरोपी निष्पन्न केला. विशाल वायकर सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ लोणंद पोलीस ठाणेचे अंमलदार सर्जेराव सुळ, फैय्याज शेख, विठ्ठल काळे यांचे खास पथक तयार करुन खाजगीवाहनाने मध्यप्रदेश राज्यातील रिवा या जिल्हयात पाठविले
तेथे मध्यप्रदेश मधील रिवा जिल्हयातील बैकुंठपुर पोलीस ठाणेचे पोलीसाची मदत घेवुन संशयीत इसम विरेंद्रकुमार रामफल वर्मा वय ३२ वर्षे रा. बेदुहुवा ता. सिरमोर जिल्हा रिवा राज्य मध्यप्रदेश यास ताब्यात घेवुन त्यांचेकडुन गुन्हयातील चोरीस नेहलेल्या रक्कमे पैकी रोख रक्कम ९लाख,८६हजार,९०० /- रुपये जप्त करण्यात आली आहे. नमुद विरेंद्रकुमार रामफल वर्मा यास अटक करून त्यास खंडाळा न्यायालयात हजर केले असता त्याची दिनांक, ०६/०४/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी घेतली आहे. गुन्हयाचा तपारा श्री गणेश माने व अवधुत धुमाळहे करीत आहेत. सदर झालेल्या घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन मा. श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, अपर पोलीस अधीक्षक श्री. बापु बांगर, व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. तानाजी बरडे यांनी तपासाबाबत योग्य त्या सुचना दिल्या.
लोणंद पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक, विशाल के वायकर, गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस अंगलदार सर्जेराव सुळ, फैय्याज शेख, विठ्ठल काळे, अमोल पवार, अविनाश शिंदे यांनी परिश्रम घेवुन गुन्हा घडले नंतर २४ तपासाचे आत घरफोडीचा गुन्हा उघडकिस आणला आहे. सदर कारवाईत सहभागी वर नमुद लोणंद पोलीस स्टेशनच्या पथकाचे पोलीस अधीक्षक सातारा, अपर पोलीस अधीक्षक सातारा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांनी अभिनंदन केले.