स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची रेकॉर्ड ब्रेक कारवाई  व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) याची काळया बाजारात विक्री करण्यासाठी तस्करी करण्याकरीता अॅम्ब्युलन्सचा वापर करणाऱ्या ४ इसमांना L.C.B ने जेरबंद करुन त्यांचेकडून ५ कोटी,४३लाख,१०,हजार रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस)  जप्त केली.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
सादिक शेख (पोलीस टाईम्स रिपोर्टर)
 गोंदवले खुर्द :
.समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व . बापु बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा यांनी सातारा जिल्हयात बेकायदेशीर हलचाली (illegal activities) करणारे इसमांचेवर लक्ष पुरवून काही आक्षेपार्ह आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत.
           दि.०९/०५/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, सातारा ते पुणे जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ चे सर्व्हिसरोडवर दिग्वीजय टोयोटा शोरुमचे समोर चार इसम व्हेल माशाची उलटी सदृष्य पदार्थ (अंबरग्रीस) विक्री करण्याकरीता कोणासही संशय येवू नये म्हणून एम.एच.०८ ए.पी.३४४३ या अॅम्ब्युलन्स मधून येणार आहेत. त्याअनुशंगाने त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांचे अधिपत्याखाली पथक तयार करुन त्यांना नमुद इसमांना ताब्यात घेवून काही आक्षेपार्ह मिळून आल्यास त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे नमुद तपास पथकाने वनविभागाकडील अधिकारी यांचे मदतीने दिग्वीजय टोयोटा शोरुमचे समोर राष्ट्रीय महामार्गावर सापळा लावला. थोडयाच वेळात प्राप्त बातमीतील अॅम्ब्युलन्स क्रमांक एम. एच. ०८ ए. पी. ३४४३ ही पुणे बाजूकडून सर्व्हिसरोडने सातारा बाजूकडे येताना दिसली. त्यास
पथकाने थांबवून अॅम्ब्युलन्सची तपासणी केली असता अॅम्ब्युलन्समध्ये एका पिशवीमध्ये एक काळपट पिवळसर रंगाचा ओबड धोबड आकाराचा पदार्थ मिळून आला. त्याची वनअधिकारी यांनी प्राथमिक तपासणी करुन तो पदार्थ व्हेल माश्याची उलटी सदृष्य पदार्थ (अंबरग्रीस) असून तो प्रतिबंधीत आहे व त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रती किलो १ कोटी रुपये किंमत असल्याचे सांगीतल्याने नमुद चारही इसमांना ताब्यात घेवून त्यांचेविरुध्द सातारा तालूका पोलीस ठाणे गु.र.नं.२०६/२०२३ वन्यप्राणी संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४२, ४३, ४४, ४८, ५१ अन्वये गुन्हा नोंद केला.
आरोपींची नावे-
१) सिध्दार्थ विठ्ठल लाकडे वय ३१ वर्षे रा. कासारविली ता. जि. रत्नागिरी, २) अनिस इसा शेख वय ३८ वर्षे रा. शिवाजीनिगर हुपरी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर, ३) नासिर अहमंद रहिमान राऊत वय ४० वर्षे रा. भडकंबा  ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी, ४) किरण गोविंद भाटकर वय ५० वर्षे रा. भाटीये ता. जि. रत्नागीरी
. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व . बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे, मदन फाळके, मधुकर गुरव, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, सुधीर बनकर, अतिश घाडगे, संतोष पवार, विजय कांबळे, संजय शिर्के, संतोष सपकाळ, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, निलेश काटकर, अजित कर्णे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, गणेश कापरे, विक्रम पिसाळ, विशाल पवार, मोहन पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, प्रविण पवार, मयुर देशमुख, वनविभागाकडील  निवृत्ती चव्हाण वनक्षेत्र अधिकारी सातारा, कुशाल पावरा वनपाल सातारा, राजकुमार मोसलगी वनरक्षक सातारा यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे . समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व . बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!