सपोनि अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली म्हसवड मध्ये अवैध धंद्यावर कारवाईचा धडाका

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)
म्हसवड प्रतिनिधी

माण तालुक्यातील धुळदेव गावाच्या हद्दीत म्हसवड पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध दारूसाठा जप्त केला. अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली कारवाई:
१४ मार्च रोजी सायंकाळी ७.४५ वाजता पोलिसांनी दोस्ती ढाब्याच्या आडोशाला छापा टाकून चेतन पांडुरंग झिमल (वय २७, रा. गंगोती, ता. माण) याला अटक केली. त्याच्याकडून ३,११० रुपये किंमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या.तर

दुसरी कारवाई:
त्याच दिवशी रात्री ८.१० वाजता जयराम मारुती कचरे (वय ४५, रा. मासाळवाडी, ता. माण) हा आठवण ढाब्याच्या आडोशाला अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत त्याच्याकडून ३,९३५ रुपये किंमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या.

कारवाई करणाऱ्या पोलिस पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, अमर नारनवर, सुरेश हांगे, जगन्नाथ लुबाळ, मैना हांगे, अभिजीत भादुले, सतीश जाधव, योगेश सूर्यवंशी, भास्कर गोडसे, राहुल थोरात, दया माळी आणि पुनम जाधव यांचा समावेश होता.

दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि अक्षय सोनवणे यांचे नेतृत्वाखाली पोलीस हवालदार एम एन हांगे करत आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!