लक्ष्मण महादेव जाधव माजी सरपंच धकटवाडी तालुका खटाव यांचे वयाच्या 83 व्या वर्षी दुःखद निधन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
विजयकुमार ढालपे
गोंदवले -प्रतिनिधी
    कै.लक्ष्मण जाधव(नाना) हे एक लोकप्रिय व्यक्तिमत्व. त्यांचे दुःखद निधन झाल्याने जाधव परिवार, नातेवाईक व समस्थ धकटवाडी ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहे.

      लक्ष्मण नाना हे राजकीय, सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील धडाडीचे नेतृत्व होते. सरकारी नोकरीत भूमी अभिलेख खात्यात निमतानदार (MS)या पदावर उत्कृष्ट कामगिरी केली. सेवानिवृत्तीनंतर ही त्यांनी अनेकांच्या शेतजमिनीची मोजणी माफक पणे करून दिली.
*धकटवाडी ग्रामपंचायत मध्ये 2003 ते 2008 या कालावधीत लोकप्रिय सरपंच म्हणून काम पाहताना निर्मल ग्राम हा पुरस्कार नवी दिल्ली येथे भारताचे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते पटकावला व धकटवाडी चे नाव देशात दिल्ली दरबारी पोहचवले. याचबरोबर सामाजिक विकासाची अनेक कामे त्यांनी यशस्वीपणे करून दाखवली. त्यांच्या परिवारात पाठीमागे पत्नी, मुलगा ,सून व दोन नातवंडे आहेत.

 

नाना यांना जाधव परिवार, नातेवाईक व समस्थ धकटवाडी ग्रामस्थ, आजी माजी सैनिक संघटना , ग्रा.पं धकटवाडी ,विविध तरुण मंडळांमार्फंत भावपूर्ण श्रद्धांजली.
छाया – लक्ष्मण जाधव


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!