*उरमोडी, जीहे- कटापुर योजनेचे जनक लोकनेते आमदार स्व.धोंडीराम वाघमारे दादा यांचे भव्य स्मारक माण तालुक्यात उभारण्यात येणार

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड(संपादक:अहमद मुल्ला )

म्हसवड दि.प्रतिनिधी
     माझ्या कायम दुष्काळी असलेल्या माण तालुक्याला दुष्काळमुक्त करायचे असेल तर बाहेरून उचलून पाणी आणल्याशिवाय पर्याय नाही.यासाठी तत्कालीन महायुती सरकारला अपक्ष आमदार म्हणून पाठिंबा देत कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन करायला भाग पाडून उरमोडी जिहे कटापूर योजनेचे जनक दुष्काळी माण तालुक्याचे लोकनेते स्वर्गीय धोंडीराम वाघमारे दादा यांचे वडजल येथे स्मारक उभारणार असल्याची माहिती फ्युचर फर्स्ट अकॅडमीचे संस्थापक अभय धोंडीराम वाघमारे यांनी दिली.
19 डिसेंबर रोजी वडजल येथे स्वर्गीय धोंडीराम वाघमारे दादा यांच्या स्मारकाचे भूमिपूजन त्यांच्या पत्नी श्रीमती निर्मला वाघमारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी माण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पैलवान बाबासाहेब माने माजी पंचायत समिती सदस्य अर्जुनराव खाडे प्राध्यापक देवकर आणि लोखंडे वडजलगावचे सरपंच धनंजय जाधव माजी सरपंच तुळशीराम काटकर गणेश काटकर उद्धव काटकर विठ्ठलांना काटकर गोविंदपंच काटकर अण्णासाहेब मगर सुभाष काटकर हनुमंत काटकर दादा सो काटकर बजरंग मगर संपत वाघमारे दत्तात्रय वाघमारे महेंद्र वाघमारे संतोष कळमकर आदी मान्यवर उपस्थित होते
दुष्काळ पाचवीला पूजलेल्या माण तालुक्यातील वडजल या गावी धोंडीराम वाघमारे यांचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झाला बालपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने  डोक्यावरील  छत्र हरवले, त्यांची अशिक्षित आई स्वर्गीय किसाबाई वाघमारे यांनी त्यांचे अत्यंत गरिबीतून पालन करून आपल्या मुलाला चांगले शिक्षण देण्यासाठी अहोरात्र कष्ट केले वेळप्रसंगी ते ज्या मराठी शाळेत शिकत होते तेथील शिक्षकांना त्याला चांगले शिकवावे यासाठी त्यांनी शाळा म्हणून  सारवण्याचे कामही त्यांनी केले लहान वयात वडिलांचे क्षेत्र हरवल्यामुळे लहानपणापासूनच घरात आईचा संघर्ष पाहून स्वतः त्यांनी तिच्याकडूनच संघर्षाचे धडे घेत पुढील काळात उच्च शिक्षण घेऊन संघर्ष करत मुंबई सारख्या शहरात राहून माण तालुका सोशल फोरम सामाजिक संघटना स्थापन करून माण तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयापर्यंत आवाज उठवत होते. लहानपणापासून भोगलेले दुःख व व अठरा विश्व पाहिलेले दारिद्र्य तसेच दुष्काळी माण तालुक्याच्या व्यथा त्यांनी सन 1983 साली त्यांच्या हुंदका या काव्य काव्यसंग्रहामध्ये मांडून दुष्काळी माणदेशाला स्वातंत्र्यानंतरही पारतंत्र्यात राहत आहोत की काय अशी अवस्था माणदेशातील जनतेची करून ठेवली होती केवळ मताचा जोगवा मागण्यासाठी पाच वर्षातून येणाऱ्या निवडणुका वर डोळा ठेवून घोषणांचा पाऊस पाडला जात होता मात्र शासनाला या भागाची कणव एकदाही आली नव्हती या माणदेशातला माणूस पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड मजूर, मातीकाम रंग कामगार आदी कामे करून टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागून कशीबशी उपजीविका करत होता . शोषित पीडित वंचित दारिद्र्य असलेला माणदेशी माणसाचे जिवनमान उंचावण्यासाठी या भागाला बाहेरून पाणी आल्याशिवाय पर्याय नाही ही खंत त्यावेळी त्यांनी त्यांच्या काव्यसंग्रहातून मांडली होती.
सन 1990 मध्ये त्यांना याच कायम दुष्काळी माण तालुक्याचे आमदार म्हणून विधानसभेत स्वर्गीय आमदार सदाशिवराव तात्या यांच्या नेतृत्वाखाली संधी मिळाली त्यांनी या संधीचे सोने करत अपक्ष आमदारांचा गट तयार करून दुष्काळी माण तालुक्याला बाहेरून पाणी आल्याशिवाय इथला शेतकरी मजूर दलित सुखी व समृद्ध होणार नाही म्हणून स्वर्गीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन करण्याची आग्रही मागणी केली त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी सर यांना या सोळा अपक्ष आमदारांचे जे काही प्रश्न आहेत पाणी समस्या आहे ती पूर्ण करण्याची सूचना दिल्या त्याचाच भाग म्हणून शासनाने उरमोडी जिहे- कट्टापूर योजनांना मंजुरी दिली तसेच म्हसवड नगरपालिका हद्दीत 18 कोटी रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना असेल शिंगणापूर नळपणी पुरवठा योजना  तसेच वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले आंधळी व ढाकणी तलाव त्यांनी त्यांच्या काळात  पूर्णत्वास नेले ही दूरदृष्टी ठेवून त्यांनी या भागाला पाणी मिळावे यासाठी आपल्या दहा वर्षाच्या आमदारकीच्या काळात हातावर चटणी भाकरी खाऊन तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी करून पाणी चळवळ उभी करत संघर्ष केला या तालुक्यातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा नेणारे स्वर्गीय धोंडीराम वाघमारे दादा हेच खरे लोकनेते असल्याने त्यांचे स्मरण भावी पिढीला व्हावे म्हणून त्यांचे वडजल येथे सन 2024 मध्ये भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती अभय वाघमारे यांनी दिली.या वेळी महादेव काटकर प्रकाश कदम शामल वाघमारे, रूपाली कळमकर,सोनाली वाघमारे क्रांती वाघमारे.वडजल गावच्या पोलीस पाटील मोनाली बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

चौकट
आ.धोंडीराम वाघमारे अपक्ष आमदार असतानाही युती सरकार ला पाठिंबा दिला होता.त्या सरकार मध्ये सहयोगी सदस्य म्हणून त्यांनी काम करताना.कृष्णा खोरे स्थापन झाले त्यावेळी जीहे कठापूर व उरमोडी या दुष्काळी तालुक्याचा समावेश करावा ही त्यांची आग्रही मागणी होती.त्यांच्या कार्यकाळात  दोन्ही योजना मंजूर होऊन प्रत्यक्ष कामना सुरुवात झाली होती.याची आठवण आज ही माणदेशी जनतेला आहे.प्रा.बापुराव देवकर- मोही


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *