स्व. धैर्यशीलराव उर्फ बाबासाहेब देशमुख-दादा यांचे दहावे पुण्यस्मरण व किर्तन सोहळा
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
निमसोड (ता. खटाव) :
हरणाई सहकारी सुतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष, समाजकार्य, सहकार्याची भावना व नेतृत्वाची परंपरा यांचे प्रातिनिधिक व्यक्तिमत्त्व असलेले स्व. धैर्यशीलराव उर्फ बाबासाहेब देशमुख-दादा यांच्या कार्याचा व आठवणींचा गौरव करण्यासाठी त्यांचा दहावा पुण्यस्मरण सोहळा शुक्रवार, दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता ‘आईसाहेब’ निवास, निमसोड येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यात रामायणाचार्य, विदर्भरत्न ह.भ.प. पद्माकर देशमुख महाराज यांचे सुश्राव्य किर्तन होणार असून त्यानंतर दादांना पुष्पांजली अर्पण करण्यात येईल. देशमुख-दादा यांनी आयुष्यभर समाजसेवा, शेतकरी कल्याण व सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी कार्य केले. त्यांच्या प्रेरणेतून हरणाई सहकारी सुतगिरणीने आर्थिक आणि सामाजिक उन्नतीचा मार्ग गावकऱ्यांसाठी खुला केला.
त्यांच्या कार्याचा आदर्श आणि सहकार्याची शिकवण आजही अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा देत आहे. कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांची या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थिती अपेक्षित आहे.
उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. रणजितसिंह धैर्यशीलराव देशमुख (जिल्हाध्यक्ष, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी), श्री. मोहनराव धैर्यशीलराव देशमुख, श्री. अभिजीत धैर्यशीलराव देशमुख आणि सौ. प्रिया सुजितराव कोंडे-देशमुख यांनी केले आहे. वेळेअभावी सर्वांना प्रत्यक्ष आमंत्रण देता आले नसल्याने हेच आमंत्रण समजून अगत्य यावे, असे आयोजकांनी सांगितले.
—

