म्हसवड शहरात भूमि अभिलेख कार्यालय सुरु करण्यात यावे :इंजि.सुनील पोरे 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक ;अहमद मुल्ला )
म्हसवड
म्हसवड शहराचा विकास हाच ध्यास कायम उराशी बाळगुन शहराच्या सर्वांगीन विकासासाठी कायम धडपडत असलेले सामाजिक कार्यकर्ते  इंजि. सुनील पोरे यांनी  म्हसवड व परिसरातील नागरीकांची  दहिवडी येथे असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयातील कामासाठी होणारी ससेहोलपट पाहून मा. जिल्हाधिकारी सातारा व जिल्हा भुमी अभिलेख अधिकारी सातारा यांचेकडे  म्हसवड शहरात भूमि अभिलेख कार्यालय सुरु करण्या विषयी निवेदन दिले  आहे 
मा. जिल्हाधिकारी व जिल्हा भुमी अभिलेख अधिकारी  यांना दिलेल्या निवेदनात  इंजि.सुनील पोरे यांनी म्हटले आहे की,
म्हसवड शहर हे माण तालुक्यात सर्वाधिक मोठे व सर्वाधिक लोकसंख्या व क्षेत्रफळ असलेले शहर आहे, शहरावर परिसरातील १२ वाड्या व १२ वस्त्यासंह जवळपास ६० लहान मोठी गावे अवलंबुन आहेत, म्हसवड ते दहिवडी हे अंतर ३५ कि.मी. आहे तर म्हसवड अंतर्गत असलेल्या शेनवडी ते दहिवडी हे अंतर सुमारे ७० कि.मी. आहे  सदरचे कार्यालय  म्हसवड येथे सुरु झाल्यास म्हसवड शहरासह परिसरातील जवळपास ७० गावातील नागरीकांची सोय होणार आहे, त्यामुळे नागरीकांची वेळ अन् पैसा निश्चीतच वाचणार आहे, याशिवाय सध्या दहिवडी येथे सुरु असलेल्या सदरच्या कार्यालयात जवळपास ७० टक्के कामे ही म्हसवड व परिसरातील गावातील नागरीकांची आहेत. म्हसवड शहरात सदर कार्यालय सुरु करण्यासाठी सुसज्ज अशी इमारत उपलब्ध आहे.
तरी मागणीनुसार म्हसवड येथे सदर कार्यालय सुरू करणेविषयी संबंधितांना आदेशित करण्यात यावे अशी विनंती इंजि.सुनील पोरे यांनी निवेदना द्वारे जिल्हाधिकारी यांना  केली आहे

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!