लांडेवाडी येथील श्रीवाघजाई देवीची रविवारी पुन: प्राणप्रतिष्ठापना शनिवारी ग्राम प्रदक्षिणा व भव्य मिरवणूक. विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
संदिप जठार :प्रतिनिधी
गोंदवले
लांडेवाडी ता. खटाव येथील जागृत देवस्थान, ग्रामदैवत श्री वाघजाई देवीच्या मूर्तीची पुन: प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्त दिनांक 21 मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नवसाला पावणाऱ्या श्रीवाघजाई देवीचे उत्तर कर्नाटक आणि सोलापूर सातारा पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाविक आहेत तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे. ग्रामस्थांनी गावातील वाघजाई देवी ज्योतिबा विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण अधिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शनिवार दिनांक 20 रोजी सायंकाळी सर्व देवतांची गावातून ग्रामप्रदक्षिणा व भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. रविवार दिनांक 21 रोजी पहाटे साडेपाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत पुण्यवाचन व होमहवन करण्यात येणार आहे. सकाळी जोतिबा विठ्ठल रखुमाई ज्ञानेश्वर संत तुकाराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.. सकाळी साडेदहा वाजता श्री वाघजाई देवीच्या मूर्तीची पुन: प्राणप्रतिष्ठापना परशुराम वाघमहाराज, वेताळभक्त दादा महाराज व निरंजन खटावकर यांच्या शुभहस्ते हजारो भाविकांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. दुपारी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. रात्री हभप अशोक महाराज नातेपुते यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे तरी पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे लांडेवाडी ग्रामस्थांनी आव्हान केले आहे.