व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला )
सुशील यादव
रायगड
म्हसळा :प्रतिनिधी
येथील केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा अपर्णा ओक यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला संस्थेचे सचिव अशोक काते ,खजिनदार सुनिल उमरोटकर,वसंतराव नाईक कॉलेजचे ग्रंथपाल प्रा.माशलेसर,रेखा धारिया ग्रंथपाल उदय करडे,सायली चोगले, प्राची मेंदाडकर,न्यू इंग्लिश स्कूलचे कामडीसर,वसावेसर,आमलेसर आणि न्यू इंग्लीश स्कूलचे विध्यर्थी मोठया संखेने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.रायप्पा माशाले यांनी भाषेत संवाद साधताना शब्दांची देवाण घेवाण झाल्याने भाषेची निर्मिती होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.शब्द संवाद साधताना बोलायला लागतो तेव्हा ज्या भाषेत बोलतो तेव्हा कंठातून विशिष्ट प्रकारचा आवाज ऐकू येतो तेव्हा काही मराठी शब्दांचा उच्चार करतांना तोंडातील वेगवेगळया अवयवांचा वापर कसा होतो आणि वाक्य शुद्ध होते याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.मराठी भाषा ही विखुरली गेली आहे.मराठी भाषेत सर्वच कवींचे, साहित्यिकांचे योगदान आहे त्यात कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे मराठी भाषे बद्दलचे प्रेम आणि त्यांनी मराठी भाषेचा केलेला सखोल अभ्यास,मराठी भाषा साहित्य गोळा करून समृद्ध कशी केली याची माहिती दिली.कुसुमाग्रजांना मुळातच आकाश चांदणे, तारे, तारकांचे वेड होते त्यामुळे अवकाश मंडळातील एका ताऱ्याला त्यांचे नाव देण्यात आले.स्वीडनमधील इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री मार्फत दि.२७ फेब्रुवारी १९९६ रोजी स्वर्गदारातील तारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तार्याला कुसुमाग्रजांचे नाव देण्यात आल्याची माहिती उपस्थितांना यावेळी माशाळे यानी दिली.
वाचनालयाचे संचालक सुनिल उमरोटकर यांनी मनोगत व्यक्त करताना आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे.आपल्या देशातील प्रत्येक राज्यात जाऊ तिथे भाषा बदलत असते असे असले तरी मराठी भाषेत किती गोडवाआहे या बाबत समाधान व्यक्त केले.संचालक रेखा धारिया यांनी एखादी संस्कृती परंपरा टिकवायची असेल तर आपली मातृभाषा टिकवायला पाहिजे असे रेखा धरिया यांनी मनोगतात सांगितले. उपस्थितांचे आभार उपाध्यक्षा अपर्णा ओक यांनी मांनले .