माण तालुका शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सिद्धनाथ हायस्कूलचे यश कुमारी वेदिका कवडे व आदेश होनमाने यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड : प्रतिनिधी
माण तालुका शालेय क्रीडा विभागामार्फत नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सिद्धनाथ हायस्कूल व जुनिअर कॉलेज, म्हसवड येथील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवले आहे.

या स्पर्धेत कुमारी वेदिका अजित कवडे हिने १९ वर्षे मुलींच्या गटात द्वितीय क्रमांक पटकावला, तर आदेश श्रवण होनमाने याने १९ वर्षे मुलांच्या गटात द्वितीय क्रमांकाची कामगिरी करून आपले कौशल्य सिद्ध केले. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे दोन्ही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक प्रियांका खांडेकर तसेच संगणक सहायक लोहार सर यांनी परिश्रमपूर्वक मार्गदर्शन केले. बुद्धिबळ या बौद्धिक खेळात विद्यार्थ्यांनी दाखविलेली कामगिरी ही शाळेसाठी अभिमानास्पद ठरली आहे.

जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी मा. श्री. अरविंद निकम, स्कूल कमिटीचे चेअरमन मा. श्री. हेमंत रानडे, व्हाईस चेअरमन ॲड. श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने, सदस्य मा. श्री. रमणलाल दोशी, मा. श्री. नितीन दोशी, मा. श्रीमंत शिवराज राजेमाने, मा. श्री. संभाजी माने, मा. श्री. विपुल दोशी, प्राचार्य मा. श्री. प्रवीण दासरे, उपप्राचार्य मा. श्री. यादव सर, पर्यवेक्षक मा. श्री. भोसले सर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

या यशामुळे सिद्धनाथ हायस्कूलचे नाव आणखी उज्ज्वल झाले असून, जिल्हास्तरीय पातळीवरही विद्यार्थ्यांकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *