कुळकजाई येथील सीतामाईच्या डोंगरावर सुवासिनींची गर्दी मकर संक्राती निमित्त हजारो महिलांनी वाण लुटला, पुरणपोळीचा आस्वाद घेत सोडला उपवास
व्हिजन २४ तास न्यूज
दहिवडी/ : दौलत नाईक
माण तालुक्यातील कुळकजाई येथील सीतामाईच्या डोंगरावर मकर संक्राती निमित्त वसा देण्यासाठी व सुवासिनीचा वाण लुटण्यासाठी महिलांनी आज दिवसभर गर्दी केली. सितामाईच्या दर्शनासाठी व वसा देण्यासाठी आज सकाळ पासूनच महिलांनी रांगा लावल्या होत्त्या.पोलीस बंदोबस्तात दर्शन बारी सुरळीत ठेवण्यात आली.
मकर संक्रातीच्यानिमित्ताने कुळकजाई येथील हजारो महिलांनी सितामाईच्या मंदिरात येऊन वाण घेतला.माण तालुक्यातील पविञ स्थान म्हणून सितामाईचा डोंगर प्रसिध्द आहे.आख्यायिकेत सांगितले आहे की प्रभू रामचंद्रानि सितामाईला कुळकजाई येथील बनात सोडले होते. सितामाई निद्रावस्थेत असताना प्रभूरामचंद्रंनी त्यांना पिण्याचे पाणी दोन द्रोणामध्ये भरुन ठेवले होते सितामाई जाग्या झाल्यानंतरत् यांच्याकडून हे द्रोण सांडले व त्यातून दोन नद्याचा उगम पावला .त्यातील एक फलटण तालुक्यातून वाहणारी बाणगंगा व दुसरी माणमधून वाहणारी माणगंगा अशी अख्यायिता सांगितली जाते .याच ठिकाणी लवकुश याचे जन्मस्थानही मानले जाते म्हणून या पवित्र धार्मिक स्थळाला विशेष महत्व आहे.
वर्षभर या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मकरसंक्रातीच्या निमित्ताने येथे याञा भरते,यासाठी विशेष दर्शनबारी उभारण्यात आली होती.वहानांची गर्दी होऊ नये यासाठी अलीकडेच वहानतळ उभारण्यात आला होता. दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक देवानंद तुपे, प्रकाश इंदलकर व सहकारी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .फलटण,बारामती, वडूज,दहिवडी आगाराने ज्यादा गाड्या सोडल्या होत्या. महिलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच पायाभूत सुविधा देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिल्या होत्या.महिलांनी वसा घेतल्यानंतर त्याच ठिकाणी उपवास सोडला,घरुन आणलेल्या पूरण पोळ्याचा आस्वाद घेत गोळ्यामेळयाने एकत्र येवून आंनंद लुटला. देवस्थानच्या वतीने प्रसादाचे आयोजन केले होते.रात्री उशीरापर्यत महिलांनी सितामाईचा डोंगर फुलून गेला होता.