कृषिरत्न बाबर यांनी घेतली राज्याच्या मुख्य सचिवांची सदिच्छा भेट.
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड… प्रतिनिधी
कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी महाराष्ट्र राज्याच्या नवनियुक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची सदिच्छा भेट घेतली असता त्यांनी माण तालुक्या तील नैसर्गिक व शेती विषयक परिस्थितीबद्दल आपुलकीने चौकशी केली.
महाराष्ट्रातील विविध कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार विजेते विश्वंभर बाबर यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना दिले. या निमित्ताने माण तालुक्यातील नैसर्गिक परिस्थिती, पीक पद्धती फळबाग व्यवस्थापन, पिण्याच्या व शेती च्या पाणीपुरवठा योजना इत्यादी बाबत माहिती जाणून घेतली.
कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याच्या विविध मागण्याबाबत अग्रक्रमाने विचार करण्याची ग्वाही राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक मॅम यांनी दिल्याची माहिती विश्वंभर बाबर यांनी दिली.