क्रांतिवीर संकुलातील खेळाडूची शालेय राज्य स्पर्धेसाठी निवड.:प्रा. विश्वंभर बाबर

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
  म्हसवड… प्रतिनिधी.
   क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड मधील १४  वर्ष वयोगटा खालील सोळा विद्यार्थ्यांची नाशिक येथे होणाऱ्या शालेय रोप स्किपिंग राज्य स्पर्धेसाठी  निवड झाली आहे.
          कोल्हापूर विभागीय १४ वर्षे वयोगटातील शालेय रोप स्किपिंग स्पर्धा नुकत्याच दहिवडी येथे संपन्न झाल्या. सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी ,क्रीडा परिषद  सातारा, व रोप स्किपिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर विभागीय स्पर्धेचे आयोजन दहिवडी येथे केले होते.या स्पर्धेत अनेक जिल्ह्याचे स्पर्धक सहभागी झाले होते.या स्पर्धेत झालेल्या अंतिम लढतीत क्रांतिवीर शैक्षणिक संकुलामधील पुढील 16 खेळाडूंची नाशीक येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
    स्पीड क्रीडा प्रकारात श्रेयश युवराज माने व प्रणया दैवान जाधव, इंदुरन्स क्रीडा प्रकारात प्रथम सचिन भोसले व अनुष्का आप्पासाहेब शेटे,
डबल अंडर मध्ये प्रतीक रायचंद खांडेकर व प्रज्ञा नातबा खांडेकर,टीम क्रीडा प्रकारात प्रतिक खांडेकर,श्रेयश माने ,यश  शशिकांत महमाने,प्रकाश पुकळे, तर फ्रीस्टाइल मध्ये वीरधवल खाडे,तेजल काटकर,तसेच स्पीड बॉल मुलीच्या संघातून काजल माने प्रणया जाधव,सानिका गोपीचंद नरळे,व शौर्या युवराज सरतापे यांची निवड झाली आहे. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक तुकाराम घाडगे  व चंद्रकांत तोरणे यांनी मार्गदर्शन केले.
       कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, सचिव सुलोचना बाबर, संकुलातील शिक्षक, पालक इत्यादी मान्यवरांनी यशस्वी खेळाडूचे अभिनंदन केले.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *