क्रांतिवीर चे स्नेहसंमेलन कलेचा सर्वोच्च आविष्कार. …. … तेजस्विनी कांबळे
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड(संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड ..प्रतिनिधी
क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड यांनी आयोजित केलेला वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम म्हणजे कलेचा सर्वोच्च आविष्कार असल्याचे प्रतिपादन सातारा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या मोटार वाहन अधिकारी तेजस्विनी कांबळे यांनी म्हसवड येथे केले.
म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील विविध शाखांच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सातारा प्रादेशिक परिवहन विभागातील मोटार वाहन अधिकारी
तेजस्विनी कांबळे तसेच खटाव सीबीएसई विद्यालयाचे प्राचार्य महेंद्र काटकर ,संस्था सचिव सुलोचना बाबर, संस्था उपाध्यक्ष अँङ . इंद्रजीत बाबर, प्राचार्य राहुल फुटाणे, विठ्ठल लवटे,अनिल माने, सुभद्रा पिसे,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना तेजस्विनी कांबळे म्हणाल्या सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडवण्यासाठी शाळेबरोबरच पालकांची जबाबदारी सुद्धा महत्त्वाची आहे.शालेय जीवनात अभ्यासाबरोबरच कला आणि क्रीडा हे दोन घटक सुद्धा महत्त्वाचे आहेत.
येथील सांस्कृतिक कार्यक्रमाचा दर्जा
म्हणजे कलेचा सर्वोच्च आविष्कार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना प्राचार्य महेंद्र काटकर म्हणाले क्रांतिवीर शैक्षणिक संकुल खऱ्या अर्थाने क्रांतिकारी संकुल असल्याचे आज पाहायला मिळाले.येथील विद्यार्थ्यांनी अभ्यास, कला, क्रीडा विभागात घेतलेली भरारी नक्कीच शिक्षण विभागासाठी दीपस्तंभ ठरणारी आहे. कृषिरत्न विश्वंभर बाबर व सुलोचना बाबर यांनी उभे केलेले हे ज्ञानमंदिर या भागातील हजारो विद्यार्थ्यांसाठी नव संजीवनी ठरणार असल्याची खात्री काटकर यांनी व्यक्त करून बाबर दाम्पत्याच्या कार्याचा गौरव केला. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
या निमित्ताने आत्मगिरी माध्यमिक विद्यालय, क्रांतिवीर इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल,क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा, नूतन मराठी शाळा, व सिद्धनाथ बालक मंदिर या शाखा मधील विद्यार्थ्यांनी विविध कला
गुणदर्शनाचे दर्जेदार व बहारदार कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमास संकुलातील शिक्षक, पालक ,विद्यार्थी तसेच रसिक प्रेक्षक यानी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालनअनिल माने व साधना दुधाळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार अनिल काटकर यांनी व्यक्त केले.