स्वच्छता मॉनिटर विभागीय समितीवर सुलोचना बाबर यांची नियुक्ती.
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड(संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड …प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग स्वच्छता मॉनिटर उपक्रमाच्या कोल्हापूर विभागीय समितीवर क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवडच्या मुख्याध्यापिका सुलोचना विश्वंभर बाबर यांची नियुक्ती झाली आहे.
याबाबतचे परिपत्रक राज्य शिक्षण विभागाअंतर्गत च्या पी एल सी स्वच्छता मॉनिटर कमिटीचे प्रकल्प संचालक रोहित आर्या यांनी नुकतेच प्रसिद्ध केले आहे.स्वच्छता मॉनिटर उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्रातून निवडलेल्या 100 शाळांमध्ये क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी म्हसवड या शाळेचा समावेश यापूर्वीच झाला असून या शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांचा यापूर्वी राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर
तसेच शिक्षण सचिव यांच्या हस्ते मुंबई येथे सन्मान करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागातर्फे मुख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा अभियान फेज 2 अंतर्गत स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राबवण्यात येत आहे.या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छता,व कचरा इतरत्र टाकण्यास मनाई याबाबतचे प्रबोधन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.या उपक्रमांतर्गत राज्य शासनाने नेमलेल्या कोल्हापूर विभागीय कमिटी मध्ये शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याचा समावेश आहे,या समितीमध्ये सदस्य म्हणून सुलोचना बाबर यांची नियुक्ती करण्यात आली असून यांच्याकडे सांगली जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
सातारा जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, माण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे ,केंद्रप्रमुख बाळासाहेब पवार कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर ,क्रांतिवीर संकुलातील प्राचार्य, मुख्याध्यापक,पालक प्रतिनिधी यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांचे अभिनंदन केले आहे.