बेरोजगार युवा पिढीला वाचवण्यासाठी  पारंपरिक शिक्षणाऐवजी व्यावसायिक शिक्षण महत्वाचे: धैर्यशील मोहिते पाटील

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड..प्रतिनिधी

बेरोजगारीच्या खाईमध्ये लोटलेल्या युवा पिढीला वाचवण्यासाठी  यापुढे पारंपरिक शिक्षणाऐवजी व्यावसायिक शिक्षण महत्वाचे असल्याचे प्रतिपादन

शिवरत्न शिक्षण संस्था अकलूज चे चेअरमन  धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हसवड येथे केले.

          म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुलास धैर्यशील मोहिते पाटील यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली.यावेळी संस्थापक कृषीरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी माजी नगरसेवक विकास गोंजारी यांचेसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले माण सारख्या दुष्काळी परिसरात क्रांतिवीर शैक्षणिक संकुलानेआपला वेगळा ठसा निर्माण केल्याचे दिसून येत आहे.

                   ग्रामीण भागातील मुलांना राष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टीने या ठिकाणी सुरू केलेली क्रांतिवीर इंग्लिश मीडियम स्कूल ही सीबीएसई पॅटर्न ची शाळा  परिसरातील विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहे. नाविन्यपूर्ण शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून संस्था व्यवस्थापन व संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर यांचा दृष्टिकोन स्पष्ट होत आहे.संस्थेमधील उपक्रमशीलता व या ठिकाणी घडलेले यशस्वी विद्यार्थी हाच त्याचा आरसा असल्याचे मोहिते पाटील यांनी सांगितले. पारंपरिक शिक्षणाऐवजी ग्रामीण भागातील युवकांच्या हाताला काम देणारी शिक्षण प्रणाली सुरू करा,. अकलूजची शिवरत्न संस्था आपल्या क्रांतिवीर संकुलाच्या पाठीशी खंबीरपणे राहील  अशी  ग्वाही देऊन या ठिकाणी सुरू असणाऱ्या दर्जेदार शैक्षणिक कार्याबद्दल  धैर्यशील मोहिते पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

 प्राचार्य राहुल फुटाणे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे आभार व्यक्त केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!