क्रांतिवीर शाळेत तज्ञ डॉक्टर कडून विद्यार्थ्यांच्या डोळ्याची तपासणी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड …प्रतिनिधी

          क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड मधील विद्यार्थ्यांच्या डोळ्याची तपासणी नेत्ररोग तज्ञ डॉ.हेमा दीपक पिंजारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

              क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी शाळा म्हसवड येथे डोळ्याचे विकार व त्यावरील उपचार तसेच घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते.तज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. हेमा दीपक पिंजारी तर प्रमुख मान्यवर म्हणून मुख्याध्यापिका सुलोचना बाबर उपस्थित होत्या.

            विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. हेमा पिंजारी म्हणाले शरीर धडधाकट मात्र दृष्टी नसेल तर मानवी जीवन संपूर्ण अंधकारमय असेल.त्यासाठीअत्यंत नाजूक असणाऱ्या डोळ्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.मोबाईल व टीव्हीचा वापर अत्यंत गरजेचे प्रमाण व योग्य अंतरावर असला पाहिजे. डोळ्याच्या चांगल्या आरोग्यासाठी टी.व्ही. कॉम्प्युटर ,लॅपटॉप,व्हिडिओ गेम याबाबत विद्यार्थ्यांनी दक्ष राहिले पाहिजे.याबरोबर डोळ्याच्या चांगल्या आरोग्यासाठी  आहार सकस व चांगला असला पाहिजे.डोळ्याचे अनेक विकार टाळण्यासाठी विटामिन व सूक्ष्म अन्नघटक युक्त आहाराचा समावेश पाहिजे.प्रामुख्याने हिरवा भाजीपाला,फळे, दूध, कच्च्या भाज्या,कडधान्य आहारात असणे गरजेचे आहे.डोळ्याच्या आरोग्यासाठी आवळा तसेच लिंबूवर्गीय फळे सुद्धा महत्त्वाचे असतात. अभ्यास व ताणतणावानंतर डोळ्याला विश्रांती देणे महत्त्वाचे असते. झोपे शिवाय डोळे बंद करून सुद्धा डोळ्याला विश्रांती देता येते.डोळ्यांची स्वच्छता राखण्यासाठी हात किंवा इतर माध्यमातून डोळे प्रत्यक्षात चोळू नयेत अन्यथा डोळ्याचे विकार उद्भभविण्याची शक्यता असल्याचे डॉक्टर पिंजारी यांनी स्पष्ट केले.

              डोळ्याची विशेष काळजी म्हणून वयोमानानुसार डोळ्याची वरचेवर तज्ञ डॉक्टर मार्फत तपासणी करून घ्यावी तसेच चष्मा वापरण्याबाबत आवाहन त्यानी केले. या निमित्ताने डॉ. पिंजारी यांनी विद्यार्थ्यांच्या डोळ्याची तपासणी केली . डोळ्याचे शिबिर व त्याबाबतची गरज याची माहिती मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी दिली.रोहिणी काटकर यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी क्रांतिवीर शाळेतील शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!