राष्ट्रीय रोप स्किपिंग स्पर्धेत क्रांतिवीर संकुल म्हसवडचा डंका.
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड.. प्रतिनिधी
नाशिक येथे संपन्न झालेल्या 11 वर्ष वयोगटातील राष्ट्रीय रोप स्किपिंग स्पर्धेत क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड च्या खेळाडूंना सात ब्रांन्झ पदक मिळाले असून या निमित्ताने माण तालुक्याचा डंका राष्ट्रीय स्तरावर पोहोचविला आहे.
महाराष्ट्र राज्य हौशी रोप स्किपिंग असोसिएशन यांच्या वतीने नाशिकच्या मिनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात 29 सप्टेंबर ते 2ऑक्टोबर दरम्यान 24 व्या राष्ट्रीय रोप स्किपिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये देशातील 20 राज्यातील 800 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत महाराष्ट्र संघातून खेळताना क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील विविध गटात 20 खेळाडूंनी सहभाग नोंदवून उज्ज्वल यश संपादन केले. क्रांतिवीर संकुल म्हसवडचे खेळाडू प्रतिक खाडे याने स्पीड जॉगर व डबल डच सिंगल फ्री स्टाईल मध्ये तृतीय क्रमांक, शौर्य कलढोणे, ईश्वरी त्रिगुणे, शिवश्री शेटे डबल डच सिंगल फ्री स्टाईल मध्ये तृतीय क्रमांक तसेच संस्कृती ढाले, प्रकाश पुकळे यांनी टीम डेमो या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक मिळवला यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक तुकाराम घाडगे व चंद्रकांत तोरणे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंच्या यशाबद्धल रोप स्किपिंग असोसिएशन सातारा जिल्हाध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर, संस्था सचिव सुलोचना बाबर,क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश काळे, पुरुषोत्तम जगताप, राज्य सचिव संजय पाटील, तांत्रिक समिती प्रमुख गिरीश टोकसे, पवन खोडे,रोप स्किपिंग जिल्हा सचिव चंद्रकांत तोरणे, क्रांतिवीर इंग्लिश मेडीयम स्कूल म्हसवड चे प्राचार्य राहुल फुटाणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पालक इत्यादींनी अभिनंदन केले..