क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेजची वैष्णवी मासाळ 88 टक्के गुण मिळवून प्रथम.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
दिलीपराज किर्तने: प्रतिनिधी
म्हसवड:-
              महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने  एच एस सी  परीक्षा 2022-23 चा निकाल नुकताच जाहीर केला.या परीक्षेमध्ये मध्ये क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेजचा 97.95 टक्के निकाल लागला असून वैष्णवी मासाळ हिने८८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे
            शैक्षणिक वर्ष  2022-23मध्ये  म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुल  अंतर्गत क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज मधील  इयत्ता बारावी वर्गाची उज्वल यशाची परंपरा कायम ठेवीत   एच एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल 97.95  टक्के  लागला.या कॉलेज मधील यशस्वी विद्यार्थी गुणानुक्रमे  पुढीलप्रमाणे   प्रथम- मासाळ वैष्णवी हणमंत 88 टक्के  द्वितीय- बाबर मिहिर संदीप    83.50 टक्के तृतीय-  जाधव अभिजीत तात्यासाहेब – 82.33 टक्के   माने अदिती हरिभाऊ – 82.17टक्के  भोसले धनराज सतीश – 80.83टक्के , भोसले वेदिका सिद्धेश्वर,80.17टक्के   गुण संपादन करून उज्वल यश मिळवीले.
 तसेच क्रॉप सायन्स या विषयात  २०० गुणांपैकी मिळविलेले प्रथम तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणे
  प्रथम- भोसले धनराज सतीश   200 पैकी 200     बनगर प्रज्ञा विलास 200 पैकी 200 तसेच माहिती व तंत्रज्ञान ( IT ) विषय प्रथम क्रमांक  ढोले सिद्धेश समीर – 100 पैकी 98   
या विद्यार्थ्यांनी विविध विषयात उज्वल यश संपादन केले.एकूण 96 विद्यार्थी पैकी 80% च्या वर सहा विद्यार्थी, 75 टक्के च्या वर दोन विद्यार्थी,तर 75 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीचे गुण संपादन केले हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.
          कॉलेजमधील  यशस्वी विद्यार्थांचे  संस्थेचे अध्यक्ष कृषिरत्न प्रा.विश्वंभर बाबर ,सचिव सौ.सुलोचना बाबर,  उपाध्यक्ष एडवोकेट इंद्रजीत बाबर,संचालक शरयू बाबर देवकर  , तात्यासाहेब अवताडे,प्राचार्य विठ्ठल लवटे , प्राध्यापक वर्ग तसेच क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील सर्व विभागप्रमुख , सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी ,पालक  या सर्वांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!