क्रांतिवीर संकुलास उज्वल भविष्य डॉ. नितीन वाघमोड
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
म्हसवड… प्रतिनिधी
सातत्यपूर्ण सर्वांगीण यशामुळे क्रांतिवीर शैक्षणिक संकुलास उज्वल भविष्य असल्याचे प्रतिपादन पुणे आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांनी म्हसवड येथे केले.
म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात इयत्ता दहावी , इयत्ता बारावी , सीईटी ,व नीट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार इयत्ता अकरावी मधील नवगत विद्यार्थ्यांचे स्वागत ,तसेच पुणे आयकर आयुक्तपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल डॉ. नितीन वाघमोडे यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता.कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर
होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आयकर आयुक्त डॉ.नितीन वाघमोडे यांचे सह संस्था सचिव सुलोचना बाबर,अशोक शिंगाडे ,विक्रम शिंगाडे, शहाजी शिंगाडे प्राचार्य राहुल फुटाणे,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉक्टर नितीन वाघमोडे म्हणाले सध्या सर्वच क्षेत्रात जीव घेणी स्पर्धा झालेले आहे.यापुढे स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी दर्जेदार शिक्षणाची गरज असून बाबर दांपत्यानी क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून सीबीएसई शिक्षण प्रणाली सह सर्व शाखा या ठिकाणी सुरू केलेल्या असून त्याचा फायदा नवीन आदर्श पिढी घडवण्यासाठी होणार आहे. या संकुलाच्या विकासाचा मी पूर्वीपासून साक्षीदार आहे.अल्पावधीत हे संकुल नावारूपाला आलेले आहे असून या पाठी मागे आदर्श संस्था व्यवस्थापन, शिक्षक व पालक यांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे वाघमोडे यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना डॉक्टर वाघमोडे म्हणाले नियमितअभ्यास करा,वेळेचे नियोजन करा,.जीवनात जिद्द , चिकाटी याबरोबरचआदर्श दृष्टिकोन ठेवा. खेळ , व्यायाम व अवांतर वाचन हे यशस्वी जीवनातील अविभाज्य घटक असून त्याची जोपासना करा.या ठिकाणी तुम्हाला सर्व शैक्षणिक सुविधा दर्जेदार स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचा लाभ घेऊनआपले व्यक्तिमत्व आदर्श घडवा असे आवाहन वाघमोडे यांनी केले.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुल हे उपक्रमशील व सर्वांगीण दृष्ट्या दर्जेदार शैक्षणिक संकुल तसेच यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांची फॅक्टरीअसल्याचे डॉक्टर वाघमोडे यांनी सांगितले. यानिमित्ताने मान्यवरांच्या हस्ते शाळा परिसरात मध्ये वृक्षारोपण करण्यात आले तसेच रोप स्किपिंग स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकाची पाहणी करण्यात आली.गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच आयटी लॅब चा शुभारंभ ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.संस्थाध्यक्ष विश्वंभर बाबर यांनी संस्थेच्या सर्वांगीन प्रगतीची माहिती उपस्थित मान्यवरांना दिली. प्रास्ताविक प्राचार्य विठ्ठल लवटे यांनी केले. गुणवंत विद्यार्थी युवराज सचिन राजमाने यांनी आपले मनोगत व्यक्त करून मी कसा घडलो याबाबत माहिती दिली. अश्विनी राजमाने व वर्षा चव्हाण यानी सूत्रसंचालन केले तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक अनिल माने आणि व्यक्त केले.