क्रांतिवीर शाळेने पटकवले तीन लाख रुपयाचे प्रथम बक्षीस
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड ..प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड ने माण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला असून शाळेला तीन लाख रुपयाचे बक्षीस मिळणार आहे.
महाराष्ट्र शासन शिक्षण विभागामार्फत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम राबवला जात आहे.तालुकास्तरावरील मूल्यांकन समितीने नुकतीच तालुक्यातील अनेक शाळांची पाहणी केली. शाळेतील उपक्रमशीलता व गुणवत्ता याबाबत मूल्यांकन समितीने मूल्यमापन केले .त्याचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. खाजगी व्यवस्थापन गटातून माण तालुका स्तरावर क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड ने प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला आहे.त्यासाठी शाळेला शासनातर्फे तीन लाख रुपयाच्या बक्षीस मिळणार आहे.
यापूर्वीही राज्य पातळीवर शाळेची आंतर राष्ट्रीय दर्जाची शाळा म्हणून निवड झालेले आहे. त्याबरोबरच राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार तसेच स्वच्छता मॉनिटर साठी क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा व मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांचा सन्मान झालेला आहे.शाळेच्या सर्वांगीण दर्जात्मक प्रगतीसाठी मुख्याध्यापिका सुलोचना बाबर तसेच शाळेतील सर्व शिक्षकानी विशेष परिश्रम घेतले.
माण तालुक्याचे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे,विस्तार अधिकारी रमेश गंबरे,केंद्रप्रमुख बाळासाहेब पवार,व अशोक गंबरे,कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर,तसेच पालक प्रतिनिधी यांनी शाळेने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक यांचे अभिनंदन केले.