म्हसवड… प्रतिनिधी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 मध्ये खाजगी व्यवस्थापन प्रभागातून क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड यांनी सलग दुसऱ्या वर्षी माण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तालुकास्तर तपासणी पथकात माण तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, गटशिक्षणा धिकारी लक्ष्मण पिसे, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गंबरे, केंद्रप्रमुख नंदकुमार तुपे , व दीपक पतंगे इत्यादी अधिकारी मान्यवरांचा समावेश होता. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळेने माण तालुक्यात सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक मिळविला आहे. शाळेतील भौतिक सुविधा, आय सी टी लॅब, क्रीडा विभागातील सहभाग, कौशल्य युक्त शिक्षण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण गुणवत्ता विकास , शाळा सुधारणा साठी निधी मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न, स्वच्छता मॉनिटर उपक्रम सहभाग, परसबाग, रेन हार्वेस्टिंग, सोलर व्यवस्था, बोलक्या भिंती, नव साक्षरता,,अध्ययन निश्चिती, विद्यांजली पोर्टल, प्रयोगशाळा, शिक्षकांची शैक्षणिक अहर्ता इत्यादी मुद्द्याला अनुसरून क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळेने उल्लेखनीय प्रगतीचे कार्य केले असून यामध्ये शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग दिसून आला. संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, शाळेतील सर्व शिक्षक, व पालकांनी यांनी या कामी विशेष परिश्रम घेतले.