व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड.. प्रतिनिधी राष्ट्रीय स्तरावर घेतलेल्या नीट वैद्यकीय पदवी पात्रता परीक्षेमध्ये क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज म्हसवडचे 12 विद्यार्थी गुणवत्ता यादी मध्ये चमकले असून क्रांतिवीर कॉलेजने आपला उज्वल यशाचा डंका कायम राखला आहे.
देश पातळीवर वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा नीट एकूण 720 गुणांसाठी दर वर्षी घेतली जाते. राष्ट्रीय स्तरावरील घेतलेल्या या परीक्षेत क्रांतिवीर ज्युनियर कॉलेज म्हसवड मधील यशस्वी विद्यार्थी व त्यांना मिळालेले गुण पुढील प्रमाणे. आयुष सुरेश पिसे 720 पैकी 690 गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान त्याने मिळविला आहे. वेदिका सिद्धेश्वर भोसले 652 , ओम राम साळुंखे 645 , मोहित नामदेव खाडे 633 , प्रणव विष्णू पवार 627 , अथर्व रमेश कापसे 620 , सुयश कृष्णा धनवडे 619 , धनराज सतीश भोसले 613 , शुभम जयेन्द्र कुमार खाडे 601 , अदिती हरिभाऊ माने 594 ,, शुभम हनुमंत काळेल 563, आशिष राजकुमार भागवत 510 गुण मिळाले आहेत. संस्थाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, संस्था उपाध्यक्ष ॲडव्होकेट इंद्रजीत बाबर , प्रा. शरयू बाबर देवकर, तात्यासाहेब औताडे, प्राचार्य विठ्ठल लवटे, शिक्षक, पालक इत्यादी मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.