क्रांतिवीर संकुल शैक्षणिक मानबिंदू ठरेल ……… डॉ. एम. के. इनामदार

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
म्हसवड… प्रतिनिधी
सर्व गुणसंपन्न युवा पिढी घडवणारे क्रांतिवीर शैक्षणिक संकुल शिक्षण क्षेत्रातील आदर्श मानबिंदू ठरेल असा विश्वास वैद्यकीय क्षेत्रातील देव माणूस डॉ. एम के इनामदार यांनी म्हसवड येथे केले.
पश्चिम महाराष्ट्र वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ डॉक्टर व अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटल चे प्रमुख डॉ. एम. के. इनामदार यांनी नुकतीच क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर , संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, प्राचार्य विन्सेंट जॉन इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉक्टर इनामदार यांनी क्रांतिवीर सी.बी.एस.ई. शाखेमधील विविध विभाग व घटकांची पाहणी केली . राष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार असणारा सीबीएसई अभ्यासक्रम म्हसवड सारख्या ठिकाणी सुरू केल्याबद्दल त्यांनी संस्था व्यवस्थापनाला धन्यवाद दिले. या क्षेत्रात अपडेट राहण्यासाठी प्राचार्य विन्सेंट जॉन यांच्याबरोबर डॉ. इनामदार यांनी संवाद साधला व मौलिक सूचना केल्या. माझा नातू सुद्धा सीबीएसई मध्ये शिकतोय,. तीच दर्जेदार शैक्षणिक सुविधा म्हसवड परिसरातील सामान्य पालकांना पुरविल्याबद्दल त्यांनी विश्वंभर बाबर व सुलोचना बाबर यांचे अभिनंदन केले. शाळेचे आदर्श व्यवस्थापन व उपक्रमशीलता याबद्दल डॉक्टर इनामदार यांनी समाधान व्यक्त करून या संकुलास उज्वल भवितव्य असल्याचे सांगितले.
आजवर लाखो रुग्णाला वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉ. एम के इनामदार हे पश्चिम महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रातील साक्षात देव माणूस असल्याचे विश्वंभर बाबर यांनी सांगितले. आमच्यासाठी ही सदिच्छा भेट दुर्मिळ असून याचे श्रेय डॉ. राजेंद्र मोडसे यांना असल्याचे विश्वंभर बाबर यांनी सांगितले.
उपस्थित मान्यवराचे आभार समन्वयक अभिजीत सावंत यांनी व्यक्त केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!