गोपुजमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार ईम्तियाज नदाफ यांच्या प्रचारार्थ कोपरा सभा – आंबेडकर जयंती उत्सव मंडळाची ५००० रुपयांची मदत
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
गोपुज : प्रतिनिधी
आगामी निवडणुकीच्या प्रचारासाठी गोपुज येथे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार ईम्तियाज भाई नदाफ यांच्या समर्थनार्थ एका कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत गोपुज येथील आंबेडकर जयंती उत्सव मंडळाने वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारासाठी ५००० रुपयांची मदत केली.
या उपक्रमातून निवडणूक पैशाविना लढवता येते आणि समाजाने एकत्रितपणे आंबेडकरी विचारांची चळवळ कशी मजबूत केली आहे याची प्रचीती आली. हे अनुदान देऊन मंडळाने निवडणुकीसाठी वित्तीय सहाय्य देत समाजाच्या व एकतेच्या मूल्यांना महत्त्व दिले आहे.
या सभेत बोलताना ईम्तियाज नदाफ यांनी आभार व्यक्त केले आणि सांगितले की, “ही मदत केवळ आर्थिक सहाय्य नाही, तर एक सामाजिक संदेश आहे. पैशाशिवायही निवडणूक लढवता येऊ शकते आणि आंबेडकरी विचारधारा मजबूत राहते, हे या कृतीतून सिद्ध होते.”