मकरसंक्रांत सणानिमित्त खास महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम व हळदी कुंकू समारंभ ” गावरान मेवा या वेब सिरीजमधिल अभिनेता गणप्या याची खास उपस्थिती”
व्हिज न२४ तास न्यूज
म्हसवड
येथील चेतना मेगा मार्ट व चेतना बझार म्हसवड यांच्या संयुक्त विद्यमाने खास महिलांसाठी मकरसंक्रांत सणानिमित्त” खेळ पैठणीचा” कार्यक्रम व हळदी कुंकु समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे सोमवार दि २३ रोजी आयोजित या कार्यक्रमासाठी गावरान मेवा या वेब सिरीज मधिल सुप्रसिद्ध गणप्या अर्थात अभिनेते महेश काळे यांच्या प्रमुख उपस्थिती खेळ पैठणीचा हा कार्यक्रम सादर होणार असून होम मिनिस्टर फेम आपले लाडके भाऊजी उद्धव (काळा पहाड) केपी हे निवेदक म्हणून या कार्यक्रमास लाभले आहे या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माणदेशी महिला बॅकेच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा व बॅकेच्या कार्यकारी अधिकारी श्रीमती रेखा कुलकर्णी उपस्थित राहणार आहे मकर संक्रांती निमित्त हळदीकुंकू व खेळ पैठणीचा यात महिलांसाठी विविध प्रकारचे सोपे सोपे खेळ, मजेशिर उखाणे व महिला मनोरंजनाचे कार्यक्रम होणार असून यात महिलांना पैठणीसह सोन्याचांदीची आकर्षक बक्षिसं जिंकण्याची संधी मिळणार आहे या कार्यक्रमासाठी मोठ्या संखेने महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक अनिलकुमार व्होरा सौ मोनिका अनिल व्होरा रुपेशकुमार व्होरा सौ मयुरी रुपेश व्होरा,परेशकुमार अनिल व्होरा ,सौ समृद्धी परेश व्होरा यांनी केले आहे स्थळ मायणी चौक म्हसवड वेळ सायंकाळी ५ वाजले पासून