खटावच्या ‘के.एम. गँग’चा सरगणा अटकेत – खुनाच्या प्रयत्नातील आरोपीवर कारवाई
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
सादिक शेख
दहिवडी | प्रतिनिधी
दहिवडी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न व इतर गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपी व खटाव येथील कुख्यात के.एम. कंपनी गँगच्या टोळी प्रमुखास व त्याच्या साथीदारास वेशांतर करून शिताफीने अटक केली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडकर व उपविभागीय अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
दिनांक ३ जून २०२५ रोजी रात्री ११.३० वाजता माण तालुक्यातील बोडके येथे फिर्यादी अनिकेत जाधव व त्याच्या मित्रांवर सशस्त्र हल्ला करण्यात आला होता. आरोपींनी लोखंडी रॉड, फायटर व काठ्यांच्या सहाय्याने जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. १८७/२०२५ कलम १८९(२), १९१(२), १९०, १०९, ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील अनेक आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली होती. मात्र टोळीप्रमुख करण बचाराम मदने (रा. खटाव) व यश विजय जाधव (रा. वडूज) हे दोघे फरार होते. गोपनीय माहितीच्या आधारे सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या पथकाने करगणी (जि. सांगली) येथे वेशांतर केलेल्या अवस्थेत करण मदने याला ताब्यात घेतले. त्याच्या माहितीवरून दुसरा फरार आरोपी यश जाधव यालाही अटक करण्यात आली.
सदर टोळीप्रमुख करण मदने याच्याविरुद्ध पूर्वी पुसेगाव पोलीस स्टेशनला अॅट्रॉसिटी व पंढरपूर पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.
ही धडक कारवाई दत्तात्रय दराडे (सहा. पो.नि.), गुलाब दोलताडे (पो.उपनिरीक्षक), चांदणी मोटे, स्वाती धोंगडे, तानाजी काळेल, रामचंद्र गाढवे, नितीन धुमाळ, निलेश कुदळे, अजिनाथ नरवट, गणेश खाडे, महेंद्र खाडे, मल्हारी खाडे व सुधीर करचे यांच्या पथकाने केली.
न्यायालयाने अटक आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास दहिवडी पोलीस करत आहेत.