माण खादी ग्रामोद्योग संस्थेस उर्जितवस्था आणण्यासाठी सहकार्य करू जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी श्री. तांबोळी

बातमी Share करा:

म्हसवड (अहमद  मुल्ला )
      म्हसवड येथे सातारा जिल्हा खादी ग्रामोद्योग  अधिकारी श्री निसार तांबोळी यांनी अहिंसा पतसंस्थेस सदिच्छा भेट दिली त्याचे समवेत तालुका अधिकारी श्री बर्गे उपस्थित होते.
    यावेळी माण तालुका खादी ग्रामोद्योग औदयोगिक संस्थेच्या निवडणुकीत नवनिर्वाचित संचालक नितिन दोशी यांचेशी चर्चा करताना सदरची संस्था उर्जितावस्था आणण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची आश्वासन जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी श्री तांबोळी यांनी दिली.
      प्रथमत, श्री तांबोळी यांचे अहिंसा पतसंस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
          या चर्चेच्या वेळी खादी ग्रामोद्योग संस्थेच्या सभासदांच्या हिताच्या दृष्टीने चर्चा झाली संस्थेच्या सभासदांना पुन्हा कर्ज वाटप सुरु झाले पाहिजे इतर सहकारी संस्था प्रमाणे कोविड काळात मृत्युमुखी पडलेल्या कर्जदाराचे कर्ज माफ झाले पाहिजे तसेच महाराष्ट्रातील या संस्थेच्या थकबाकी दारांचे कर्ज शासनाने माफ करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे अशा विषयावर चर्चा झाली.
      नितिन दोशी यांनी जिल्हा खादी ग्रामोद्योग कार्यालयाकडून अनुदान प्राप्त कर्ज योजना राबवण्यासाठी मागणी केली.
    माण तालुका खादी ग्रामोद्योग औदयोगिक संस्थेच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत लवकरच माण  खटावचे आमदार मा.जयकुमार गोरे भाऊ यांचेशी नवनिर्वाचित संचालक,जिल्हा खादी ग्रामोद्योग  अधिकारी श्री तांबोळी,तालुका सचिव श्री बर्गे साहेब अशी संयुक्त बैठक घेण्याचे ठरवण्यात आली आहे अशी माहिती नवनिर्वाचित संचालक नितिन दोशी यांनी दिली.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!