काटकरवस्ती बंधा-याचे काम पूर्ण होऊनही उरमोडीचे पाणी सोडण्याचे योग्य नियोजन नसल्याने पिके लागली जळू
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड .
माणगंगा नदीवरील काटकरवस्ती जवळील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधून तयार झाला असुन किरकोळ काम बाकी असले तरी त्यामध्ये पाणी अडवण्यासाठीची यंत्रणा तयार झाली आहे. पाणी अडवण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी दरवाजे येवून पडले आहेत.अधिकारीवर्गाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे लोखंडी दरवाजे बसवले नाहीत.
गेल्यावर्षी नदीला आलेले पाणी बंधा-यातून वाहून गेले त्याचा उपयोग आसपासच्या शेतीसाठी किंवा वरकुटे वाकी माळवाडी या गावांसह इतर वाड्या वस्त्यांवरील पाणीपुरवठा योजनांच्या विहीरींना झाला नाही.त्यामुळे या परिसरात जरी बंधारा असला तरी शासनाच्या वतीने योग्य नियोजन नसल्याने बंधा-यासाठी खर्च करण्यात आलेले कोट्यावधी रुपये वाया गेले आहेत असेच म्हणावे लागेल.
यावर्षी एप्रिल व मे महिन्यात उरमोडी धरणातील पाण्याने पळशी हद्दीतील बंधारे तसेच म्हसवड हद्दीतील शेंबडेवस्ती व विश्रामगृहाजवळील बंधारे भरुन घेतले आहेत त्याचा उपयोग संबंधित परिसरातील शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी केला जात आहे.
विहिरींचे पाण्यानेही तळ गाठला
काटकरवस्ती जवळील बंधा-यात उरमोडीचे पाणी सोडण्यासाठी लागणारे वीजबीलाचे पॆसे शेतकरी भरण्यास तयार होते पण कुठे राजकारण आडवे आले आणी दोन दिवसात बंधा-यात येणारे पाणी गायब झाले आहे. त्यामुळे या परिसरातील पिके वाळून निघाली आहेत तर वरकुटे वाकी माळवाडी येथील पाणीयोजनांच्या विहिरींचे पाण्यानेही तळ गाठला आहे त्यामुळे पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
जिहे कठापुर योजनेच्या पाण्याचीही प्रतिक्षाच
जिहे कठापुर योजने अंतर्गत येणारे पाणी आंधळी धरणात साठवून पुढे माणगंगा नदीपात्रात सोडून नदीवरील बंधारे भरण्याची योजना आहे पण त्याचीही अजून प्रतिक्षाच करावी लागत आहे.
शासनाच्या जबाबदार अधिकारी वर्गाने व लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष घालून नदीपात्रात पाणी सोडण्यात येणा-या अडचणींवर तोडगा काढून नदीपात्र वाहते करावे अशी मागण होत आहे.