व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड रयत शिक्षण संस्थेचे गोपालकृष्ण विद्यालय, गोंदवले खुर्द (तालुका माण, जिल्हा सातारा) येथे डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री. नदाफ एन. डी., गोंदवले खुर्दच्या सरपंच सौ. सिंधूताई गाढवे, ॲड. प्रभाकर कारंडे (भाऊ), आणि श्री. राजेंद्र कदम यांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमात स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री. मधुकर मोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. कैलास पोळ, शाळा विकास समितीच्या अध्यक्ष सौ. वैशाली कुलकर्णी, पालक श्री. अजित भोंडवे, श्री. चंद्रकांत लोखंडे यांची विशेष उपस्थिती होती. प्रतिमा पूजनानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून काढण्यात आली, ज्यात 50 विद्यार्थिनींचे लेझीम पथक आणि आर. एस. पी. पथक सहभागी झाले.
समाज मंदिरासमोर लेझीम पथकाने संगीताच्या तालावर अप्रतिम नृत्य सादर केले. या पथकाला कलाशिक्षक आणि आर. एस. पी. शिक्षक श्री. सादिक शेख यांचे मार्गदर्शन लाभले. कलारंजन गणेश मंडळाच्या वतीने विद्यालयातील मुख्याध्यापक श्री. नदाफ यांचा आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान ग्रामपंचायत सदस्य श्री. विजयकुमार अवघडे यांच्या हस्ते करण्यात आला.
मिरवणूक गावातील विविध ठिकाणी थांबवून प्रतिमेचे पूजन माता पालक, महिला ग्रामस्थ, पुरुष ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी केले. मिरवणुकीची सांगता मारुती मंदिरासमोर झाली. यानंतर ग्रामस्थांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक श्री. नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक श्री. सादिक शेख, श्री. उगलमुगले, श्री. जाधव, श्री. माने, श्री. घोडके, सौ. शेडगे
आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले.