गोपालकृष्ण विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती उत्साहात साजरी
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
गोंदवले खुर्द (प्रतिनिधी) –
रयत शिक्षण संस्थेच्या गोपालकृष्ण विद्यालय, गोंदवले खुर्द, तालुका माण, जिल्हा सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री. नदाफ एन. डी. सर यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांमध्ये गोंदवले खुर्द चे विद्यमान उपसरपंच श्री. अमोल पोळ, माजी सरपंच श्री. अजित पोळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. कैलास पोळ, तसेच संचालक श्री. विलास काळे, श्री. अभय शेडगे, संचालिका सौ. सुवर्णा कदम आणि गोपालकृष्ण पंचक्रोशी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था गोंदवले खुर्दच्या संचालिका सौ. वैशाली कुलकर्णी उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्यावर भाषण केले. श्री. गोपीनाथ घोडके सर यांनी कर्मवीरांच्या कार्याची महती सांगितली. वसिम शेख (इ. ५ वी) आणि श्रिजल खलाटे (इ. ८ वी) यांनी त्यांच्या विचारांची भाषणे सादर केली, ज्यामुळे उपस्थितांची मने जिंकली.
या विशेष प्रसंगी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. चित्रकला स्पर्धा, गीत गायन, नृत्य, वक्तृत्व, निबंध, रांगोळी स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. याशिवाय खेळांचे आयोजन करण्यात आले होते. एलिमेंटरी व इंटरमिजिएट शासकीय चित्रकला परीक्षा, एन.एम.एम.एस. स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नदाफ सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला श्री.सादिक शेख सर,श्री. उगलमुगले सर, श्री. जाधव सर श्री. माने सर, श्री. घोडके सर ,सौ. शेडगे मॅडम विद्यालयाचे लेखनिक श्री. जगदाळे सर शिक्षकेतर कर्मचारी श्रीमती अवघडे मॅडम, श्री. प्रदीप घाटगे, विद्यार्थी विद्यार्थिनीं सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्कृष्ट रित्या यशस्वी पार पडला.