*कारगिल विजय दिवस दर वर्षी प्रमाणे शुक्रवार दि.26 जुलै 2024 रोजी कराड तालुक्यात होणार साजरा
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
कराड:प्रतिनिधी
१९९९ मध्ये ०३ मे ते २६ जुलै भारतीय सैन्याने पाकिस्तान सेनेविरुद्ध कारगिल युध्दात विजय मिळवुन अशक्य ते शक्य करुन दाखविले. या युध्दात भारतीय सैनिकांचा दृढनिश्चय आणि पराक्रम जागोजागी दिसुन आला. त्यामुळे तोलोलींग , टायगर हिल इत्यादी पाकिस्तानने कब्जा केलेली ठाणी भारतीय सैन्याने जिंकली. दि. २६ जुलै १९९९ रोजी पाकिस्तानी सैनिकांनी कब्जा केलेले शेवटचे ठाणे भारतीय सैन्याने जिंकुन भारतीय सीमा अतिक्रमण मुक्त केली तो दिवस कारगिल विजय दिवस म्हणुन साजरा केला जातो.
आज या कारगिल युद्धाला 25 वर्षे पूर्ण होत असून त्याचे रोप्य महोत्सवी वर्ष कारगिल विजय दिवस हा सर्व हुतात्म्यांच्या बलिदानास स्मरुन त्यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहीद जवान कुटुंबीयांचा सन्मान करण्या साठी कराड तालुक्यामध्ये दरवर्षी प्रमाणे साजरा होत आहे
ठिकाण*: ( 1)*सकाळी 9 वाजता विजय दिवस चौक कराड विजय स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन
(२) सकाळी 10 वाजता अंतवडी गावचे सुपुत्र कारगिल योद्धा शहीद वीर जवान महादेव निकम यांच्या समाधीस्थळी पुष्प चक्र अर्पण करून अभिवादन “
आओ झुक कर सलाम करें उनको
जिनके हिस्से में यह मुकाम आता है।
कितने खुशनसीब है वह लोग
जिनका लहू इस देश के काम आता है”।


