करणभैय्या पोरे व मित्र समूहाची समयसुचकतेने मोठा अनर्थ टळला*

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड प्रतिनिधी :

      शॉर्टसरकिटमुळे म्हसवड -पुलकोटी रस्त्यावर झाडाझुडपाना लागलेली आग करणभैय्या पोरे यांनी आपल्या मित्र समूहाच्या सहकार्याने अथक परिश्रम घेऊन आग विझवली त्यांच्या या समय सूचकते मुळे मोठा अनर्थ टळला
   या बाबत सविस्तर माहिती अशी की म्हसवड -पुलकोटी रस्त्यावर वीज तार तुटल्या मुळे शॉर्टसरकिटने आग लागली वाळलेले झाडझुडपे व उन्हाळ्याचे दिवस असलेने आगीने भीषण स्वरूप धारण केले ही खबर कळताच करणभैय्या पोरे व मित्र समूहाने लोकसभा निवडणूक प्रचार सोडून घटना स्थळी सवंगड्या समवेत धाव घेतली व आग विझवणेचे कार्य हाती घेतले

     दरम्यान अग्निशामक साठी नगरपालिकेशी संपर्क केला तथापि सदर अग्निशामक प्रचार सभेसाठी येणारे झेड सुरक्षा धारकांचे सुरक्षेसाठी परगावी गेला होता मग मागचा पुढचा विचार न करता स्वताचे वाहनातून टाक्या ठेऊन पाणी आणुन आग आटोक्यात आणली विशेष म्हणजे पुढे थोडया अंतरावर गॅस गोडाऊन होते या आगीमुळे मोठी दुर्घटना घडली असती यामुळे परिसरात करणभैय्या पोरे यांचे समयसुचेकतेचे कौतुक होत आहे

       यावेळी त्यांना ऍड. शुभम पोरे, सागर नामदे ,दादा खासबागे, विशाल गोंजारी ,विशाल लोखंडे ,अदिनाथ पिसे ,प्रशांत चव्हाण आदी सवंगड्यांनी परिश्रम घेतले व पुढील अनर्थ टळला


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!