कराड तालुका तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे यांचा सैनिक फेडरेशन कडून सन्मान

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

कुलदीप मोहिते कराड

   सैनिक फेडरेशन अध्यक्ष सातारा जिल्हा प्रशांत कदम व सर्व माजी सैनिक यांच्यावतीने नवीन रुजू झालेल्या तहसिलदार श्रीमती कल्पना ढवळे यांना सैनिक फेडरेशन चे अभिनंदन पत्र देऊन सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा याप्रसंगी देण्यात आल्या.

     यावेळी आज पर्यंत सेवारत सैनिक, माजी सैनिक,त्यांचे कुटुंबीय, शहीद जवान कुटुंबीय यांच्या समस्या विषयी अवगत करण्यात आले व अमृत वीर जवान सन्मान अभियान अंतर्गत तालुक्यातील सैनिकांच्या समस्या सोडिण्यासाठी व सैन्य दलामध्ये शहीद झालेल्या जवानाचे शहीद दिवस साजरे करणे बाबत तत्कालीन तहसीलदार विजय पवार साहेब यांनी प्रशासनाच्या वतीने अभियानाच्या माध्यमातून केलेले प्रयत्न सोडवलेल्या समस्या, अडचणी विषयी व सैनिक कक्ष स्थापन केल्या संदर्भात अवगत करण्यात आले. सर्व माहिती देण्यात आली.

        या सर्व माहिती नंतर नवनिर्वाचित तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे यांनी सर्व माजी सैनिकाना आश्र्वशित केले की ज्या प्रमाणे प्रशासनाच्या वतीने सैनिकांच्या साठी जे काम पहिले झाले आहे त्या प्रमाणे पुढे ही असेच काम होईल त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम आपण व प्रशासन कायमस्वरूपी प्रयत्नशीलराहू असे नवनिर्वाचित तहसीलदार यांच्या वतीने सांगण्यात आले.

       या प्रसंगी .प्रशांत कदम जिल्हाअध्यक्ष सैनिक फेडरेशन सातारा,.संतोष यादव (नि.)सुभेदार,.रमेश जाधव (नि.) सुभेदार ,. राजेंद्र जाधव (नि.) सुभेदार,.खाशाबा वाघमारे (माजी सैनिक),.पवार साहेब (माजी सैनिक),सुधीर जाधव(माजी सैनिक) सर्व माजी सैनिक उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!